ऑम्स्क: रशियाच्या ऑम्स्क प्रांताची राजधानी. लोकसंख्या सु. ,२१,००० (१९७०). पश्चिम सायबीरियातील महत्त्वाचे उद्योग केंद्र. ट्रान्स-सायबीरियन लोहमार्गावर इर्तिश व ऑम नद्यांच्या संगमावर हे वसले असून येथे शेतीची अवजारे, मोटारी, जहाजे, आगगाडीचे भाग, मांस, पीठ, कातडे, लाकूड, तेलशुद्धी इत्यादींचे कारखाने आहेत. हे नदी व लोहमार्ग वाहतुकीचे मोठे केंद्र आहे.

लिमये, दि.