अवंतिपूर : जम्मू व काश्मीर राज्याच्या अनंतनाग जिल्ह्यातील झेलम नदीकाठचे पुण्यक्षेत्र. श्रीनगर-जम्मू रस्त्यावर हे श्रीनगरपासून २९ किमी. दक्षिणेस आहे. नवव्या शतकात अवंतिवर्मन्‌ राजाने येथे आपली राजधानी स्थापली. त्याने बांधलेल्या अवंतिस्वामी ह्या विष्णूच्या आणि अवंतीश्वर ह्या शिवाच्या मंदिरांचे अवशेष समृद्ध आणि सुबक नक्षीकामाने युक्त आहेत.

दातार, नीला