ॲलनटाउन: अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी पेनसिल्व्हेनिया राज्यातील औद्योगिक शहर. लोकसंख्या १,०९,५२७ (१९७०). हे लिहाय नदीच्या तीरावर, फिलाडेल्फियाच्या वायव्येस ८८ किमी. व न्यूयॉर्कच्या पश्चिमेस १५० किमी. अंतरावर आहे. हे शहर पोलाद, मोटारी, सिमेंट, यंत्रे, इलेक्ट्रॉनिक साहित्य, कापड, तंबाखूचे पदार्थ यांच्या उत्पादनाकरिता प्रसिद्ध आहे. म्यूहलेन्बर्ग महाविद्यालय, महिलांकरिता सेडरक्लेस्ट महाविद्यालय ह्या शैक्षणिक संस्था येथे आहेत. सप्टेंबर महिन्यात येथे मोठी जत्रा भरते.

लिमये, दि. ह.