इगतपुरी: नासिक जिल्ह्यातील तहसिलीचे व थंड हवेचे ठिकाण. लोकसंख्या १७,४१५ (१९७१). थळघाटाच्या माथ्यावर, समुद्रसपाटीपासून ६०७ मी. उंचीवरील मध्यरेल्वेचे हे स्थानक मुंबईपासून १३४ किमी. व मुंबई–आग्रा महामार्गावर नासिकपासून ५९ किमी. आहे. येथून दीड किमी. वरील नयनरम्य सरोवरातून शहराला पाणीपुरवठा होतो. येथे रेल्वेची कर्मशाळा असून अनेक आरोग्यधामे आहेत.

जोशी, चंद्रहास