आदित्य : वैवस्वत मन्वंतरातील एका देवतासमूहाचे नाव. ⇨दिती  या देवतेचे पुत्र आदित्य. ऋग्वेदानुसार ह्या समूहात मित्र, अर्यमा, भग, वरुण, दक्ष, अंश इ. देवतांचा अंतर्भाव होतो. सूर्यालाही आदित्य म्हटले आहे.

अथर्ववेदात त्यांची संख्या आठ सांगितली आहे. अंश, भग, धाता, इंद्र, विवस्वान्, मित्र, वरुण व अर्यमा अशी त्यांची नावे तैत्तिरीयब्राह्मणात आहेत. अदितीच्या आठव्या पुत्राला ऋग्वेदात वशतपथब्राह्मणात मार्तंड म्हटले आहे.

वेदोत्तर साहित्यात त्यांची संख्या बारा असून बारा मासांचे ते निदर्शक आहेत, असे उल्लेख आढळतात. पैकी विष्णू हा सर्वश्रेष्ठ आदित्य होय. भविष्य व स्कंद या पुराणांत बारा आदित्यांच्या दोन वेगवेगळ्या नामावळ्या आहेत.

सुर्वे, भा. ग.