सॉलिसी, रिबॉथेनेरा आंतोन्यो  दे : (ऑक्टोबर१६१०–१९ एप्रिल १६८६). एक थोर स्पॅनिश इतिहासकार, नाटककार व राजनीतिज्ञ. आल्कला दे देनारेस (स्पेन) येथे त्याचा जन्म झाला.त्याच्या पूर्वायुष्याविषयी फारशी विश्वसनीय माहिती उपलब्ध नाही.त्याने तत्कालीन रुढीनुसार शिक्षण घेऊन राजदरबारात नोकरी पतकरली.राजाने त्याची कर्तबगारी पाहून इ. स. १६५४ मध्ये त्यास आपलाखासगी सचिव नेमले. चौथ्या फिलिप (कार. १६२१–६५) राजाच्या पदरीअसताना त्याने आपले लेखन-वाचन चालू ठेवले. त्यातून त्याने इतिहासावरलेखन केले. त्यामुळे राजाने त्याची इंडिजचा इतिहासलेखक-वृत्तांतकार या प्रतिष्ठित पदी नियुक्ती केली (१६६५). पुढे त्याची अधिकृतधर्माधिकारी म्हणून नियुक्ती झाली (१६६७). ही विविध पदे भूषवितअसताना त्याने बहुविध विषयांवर लेखन केले. त्याच्या ग्रंथांपैकीहिस्टोरिया द लाक्वांक्विस्ता द मेक्सिको (१६८४) हा इतिहास ग्रंथ वअमोर य ऑल्बिगेशियन, एल् अमोर अल् असो, अन बोबो हेस सिंटो  आणि ला जितानिल्ला द माद्रिद ही नाटके प्रसिद्घ आहेत. त्याची नाटकेविलक्षण गुंतागुंतीची, विनोदप्रचुर आणिलोकसाहित्याशी जवळीकदर्शविणारी असल्यामुळे राजदरबारी लोकप्रिय झाली होती. अद्यापि त्यांपैकीकाही नाटकांचे प्रयोग प्रसंगोपात्त होत असतात. त्यावरुन त्याचे साहित्यिकमूल्य अबाधित आहे, असे दिसते. त्याच्या Comedias (१६८१)वर विख्यात स्पॅनिश नाटककार ⇨ पेद्रो काल्देरॉन दे ला बार्का ह्याचाप्रभाव आहे. त्याचा हिस्टोरिया द ला … हा इतिहासग्रंथही सतराव्याशतकातल्या गद्यवाङ्‌मयातील एक श्रेष्ठ साहित्यकृती मानण्यात येतोमात्र तोऐतिहासिकदृष्ट्या विश्वसनीय नाही कारण त्यात ॲझटेकशोकांतिका नाही. पण त्यात कोर्ट्स लोकांवर त्याने स्तुतिसुने उधळलीअसून त्यांचे उदात्तीकरण केले आहे.

माद्रिद येथे त्याचे निधन झाले.

देशपांडे, सु. र.