हायपर्स्थीन :पायरोक्सीन खनिजांपैकी ऑर्थोपायरोक्सीन उप-गटातील हे खनिज असून त्याचे स्फटिक समचतुर्भुजी, प्रचिनाकार वलहान असतात [→ स्फटिकविज्ञान]. लहान प्रचिनाकार स्फटिकांच्या व ओबडधोबड आकाराच्या कणांच्या रूपात ते सिकत व अत्यल्पसिकत ( सिलिकेचे प्रमाण कमी व अतिशय कमी असणाऱ्या) अग्निज खडकांत आढळते. त्याचा रंग करडा, हिरवट, गडद तपकिरी, काळसर व पिवळसर पांढरा असून कस हिरवट पांढरा असतो. त्याचे ? पाटन सुस्पष्ट असून पाटनपृष्ठाची चमक काशासारखी असते. कठिनता ५-६वि. गु. ३-४ चमक काचेसारखी वा रेशमासारखी भंजन ओबड-धोबड असते. रा. सं. (Mg. Fe)2 Si2O6 [→ खनिजविज्ञान]. याची गुलाबी व हिरव्या रंगांतील बहुवर्णता वैशिष्ट्यपूर्ण आहे. लाव्हा थंड होताना ऑलिव्हीन या खनिजानंतर हायपर्स्थीन हे तयार होणारे दुसऱ्या क्रमांकाचे खनिज आहे. दक्षिण भारतात ते चार्नोकाइट नावाच्या खडकांत आढळते. [→ चार्नोकाइट माला]. ⇨ हॉर्नब्लेंड या खनिजापेक्षा हायपर्स्थीन याची कठिनता अधिक असल्याने अतिशय व प्रबल या अर्थाच्या दोन ग्रीक शब्दांवरून याचे हायपर्स्थीन हे नाव पडले आहे.
पहा : पायरोक्सीन गट.
बरीदे, आरती
“