हेमिमॉर्फाइट : हे जस्ताचे पांढरे, रंगहीन, फिकट हिरवे, निळेवा पिवळे खनिज असून जस्ताचे धातुक (कच्च्या रूपातील धातू) आहे. त्याला हेमिमॉर्फाइट याची स्फटिक संरचना कॅलॅमाइन, विद्युत् कॅलॅमाइन वा गॅल्मेई असेही म्हणतात. स्फटिक समचतुर्भुजी प्रसूच्याकार [→ स्फटिकविज्ञान] स्फटिक बहुधा वडी-सारखे व गटाने आढळतात. शिवाय ते स्तनाकार, झुंबराकार, संपुंजित व कणमय रूपांतही आढळते.पाटन (110) स्पष्ट कठिनता ४.५–५ वि.गु. ३.४-३.५ चमक काचेसारखी रंग पांढरा, काही बाबतींतफिकट निळसर वा हिरवट छटा, शिवाय पिवळा ते उदी भंजन उप-शंखाभ पारदर्शक ते दुधी काचेप्रमाणे पारभासी तीव्रपणे उत्ताप विद्युतीय [→ खनिजविज्ञान]. रा. सं. Zn4(Si2O7)(OH)2 H2O. हे जस्ताचे सजल सिलिकेट (जस्त ६७.५%) असून त्यात अल्प प्रमाणात ॲल्युमिनियम व लोखंड असू शकतात. ते बंद नळीत तापविल्यास पाणी मिळते. त्याच्या स्फटिकांचे समूह वैशिष्ट्यपूर्ण असल्याने तेस्मिथसोनाइटा हून वेगळे ओळखता येते. 

 

हेमिमॉर्फाइट हे द्वितीयक (नंतरच्या प्रक्रियांनी बनलेले) खनिज असून जस्ताच्या निक्षेपांच्या ऑक्सिडीभूत भागात आढळते. स्मिथसोनाइट, स्फॅलेराइट, सेर्‍युसाइट, अँग्लिसाइट व गॅलेना ही याच्याबरोबर आढळणारी खनिजे होत. बेल्जियम, जर्मनी, रूमानिया, सार्डिनिया, कंबरलँड, इंग्लंड, अल्जीरिया, मेक्सिको व अमेरिका येथे ते आढळते. जस्ताचे धातुक म्हणून त्याचा उपयोग होतो. त्याच्या स्फटिकांच्या अर्धाकृती( हेमिमॉर्फिक) वैशिष्ट्यावरून त्याला हेमिमॉर्फाइट हे नाव दिले. 

 

बरीदे, आरती ठाकूर, अ. ना.