खिलनमर्ग : जम्मू व काश्मीर राज्यातील सहलीचे ठिकाण. श्रीनगरच्या पश्चिमेस ४६ किमी. गुलमर्ग व तेथून ६ किमी. अंतरावर, गुलमर्गपेक्षा ६१० मी. उंच व समुद्रसपाटीपासून ३,२०० मी. उंच पहाडावर खिलनमर्ग वसले आहे. गालिच्याप्रमाणे रंगीबेरंगी फुलझाडांनी आच्छादलेला परिसर, निसर्गरम्य झरे, उत्तरेकडे दिसणारी नंगा, हरामुख पर्वतशिखरे तसेच वुलर सरोवर इत्यादींमुळे हे प्रवाशांचे आवडते ठिकाण आहेच त्यातच बर्फावरील घसरगुंडीच्या खेळांसाठी हे ठिकाण विकसित करण्यात येत असल्याने यास महत्त्व आले आहे.

शाह, र. रू.