कुरडू: (हि. सफेद मुर्धा गु. लांबडी क. गोरंजि सं. वितुन्न भुरूंडी लॅ. सेलोशिया अर्जेन्शिया  कुल-ॲमरँटेसी). ही लहान वर्षायू (एक वर्ष जगणारी) ⇨ ओषधी  तणाप्रमाणे पावसाळ्याच्या शेवटी भारतात आणि उष्णकटिबंधात शेतात व इतरत्र आढळते. खोड व फांद्या पन्हाळीदार पाने साधी, विविध, एकाआड एक अग्रस्थ कणिशावर लहान, सच्छद, प्रथम गुलाबी नंतर पांढरी फुले सप्टेंबर–डिसेंबरमध्ये येतात. परिदले १–५, केसरदले ५ केसरतंतु तळाशी परस्परांशी जुळून पेल्यासारखा व पातळ भाग बनतो किंजपुट ऊर्ध्वस्थ, बीजके ४–८ [→ फूल] फळ करंडरूप बिया चापट, काळ्या, चकचकीत असून त्यांचा उपयोग अतिसार, रक्तदोष, मुखव्रण, नेत्ररोग, दृष्टीदोष, मूत्ररोग इत्यादींवर करतात. कुरडूच्या काही शोभिवंत जाती (से. प्ल्युमोजा  व से. क्रिस्टॅटा-मोरशिखा) बागेत लावतात. (चित्रपत्र ५३).

  

पहा : ॲमरँटेसी  

चौगले, द. सी.

कुरडू : फुलोऱ्यासह वनस्पती.