कीटिने : कार्बनी संयुगांचा एक वर्ग. यात 26-1 हा गट असतो. येथे R व R’ हा अल्किल (कार्बन अणूंची साखळी असलेले) अथवा अरिल (कार्बन अणूंचे द्विबंधयुक्त वलय असलेले) गट किंवा हायड्रोजन अणू असतो. उदा., CH2=C=O, CH3-CH= C=O,(C6H5)2C=C=O.

 

कीटिनांचा शोध स्टॉडींजर यांनी १९०५ मध्ये लावला आणि CH2=C=O हे कीटीने विल्समोर यांनी १९०७ मध्ये बनविले. ही संयुगे म्हणजे ⇨ कारबॉक्सिलिक अम्लाच्या एका रेणूतून पाण्याचा एक रेणू काढून टाकल्याने बनणारी ॲनहायड्राइडे आहेत असे समजता येईल.

 

अल्डो-कीटिने R-CH=C=Oआणिकीटो-कीटिने(RR’) C=C=O(R व R’=अल्किल किंवा अरिल गट) असे यांचे दोन विभाग केले जातात.

 

α-हॅलो-अम्ल-हॅलाइडांवर तृतीयक ⇨ अमाइनांची किंवा जस्ताची विक्रिया केल्यास कीटिने तयार होतात.

(CH3)2-C-Br-CO-Br+Zn

→ 

(CH3)2 C=C=O

α-मिथिल- α-ब्रोमो प्रोपिऑनील  ब्रोमाइड 

डायमिथिल कीटीन +ZnBr2

 

उच्च कीटिनांचा उद्योगधंद्यांत उपयोग होत नाही, परंतु ती स्थिर असल्यामुळे कीटिनांच्या विक्रियांचा अभ्यास करण्यासाठी ती फार उपयोगी ठरली आहेत.

कीटीन CH2=C=O हे या वर्गातील सर्वांत महत्त्वाचे संयुग आहे. ब्रोमो-ॲसिटिल ब्रोमाइडावर जस्ताची विक्रिया केल्यास हे मिळते. तथापि औद्योगिक दृष्ट्या याचे उत्पादन ॲसिटोन, ॲसिटिक अम्ल (किंवा एथिल ॲसिटेट) यांचे उत्ताप विच्छेदन करून (उच्च तापमानाला तुकडे करून) करतात.

CH3COOH 

६८०  ७२०से. 

————→ 

CH2=C=O 

H2

 

असिटिक अम्ल 

कीटीन 

 

CH3-CO-CH3 

६८० —७२०से. 

————→ 

CH2= C=O 

CH4 

ॲसिटोन 

कीटीन 

मिथेन 

 

गुणधर्म: कीटीन हा एक वर्गहिन व अत्यंत विक्रियाशील वायू आहे वितळबिंदू -१५१ से. व उकळबिंदू -५६ से. तो ईथर व ॲसिटोन यांत विद्राव्य आहे. पाणी आणि अल्कोहॉल यांनी त्याचे अपघटन होते (लहान रेणूंत तुकडे होतात).

 

कारबॉक्सिलिक अम्लांशी याची समावेशक (दोन किंवा जास्त संयुगे एकत्र येऊन नवीन पदार्थ तयार होण्याची) विक्रिया होऊन अम्ल ॲनहायड्राइडे मिळतात. या पद्धतीने ॲसिटिक अम्लापासून ॲसिटिक ॲनहायड्राइडाचे औद्योगिक उत्पादन करतात. याची पाण्याबरोबर विक्रिया होऊन कारबॉक्सिलिक अम्ले बनतात व अल्कोहॉलांबरोबर विक्रिया केल्यास एस्टरे मिळतात. कीटीन आणि अमोनिया यांच्या संयोगाने ॲसिटामाइड (CH3-CO-NH2)मिळते. अमानियाऐवजी अमाइने वापरल्यास प्रतिष्ठापित (एक वा अनेक अणू काढून त्या जागी दुसरा अणू बसविलेली) अमाइडे बनतात.

26-2

(R, R’ = अल्किल, अरिल गट किंवा हायड्रोजन). ब्रोमिनाच्या विक्रियेने ब्रोमो-ॲसिटिल ब्रोमाइड (CH2Br-CO-Br) मिळते. ह‍ॅलोजन अम्ले व कीटीन यांच्या विक्रियेने ॲसिल हॅलाइडे मिळतात.

CH2=C=O

+

HCI

=

CH3-CO-CI

कीटीन 

हायड्रोक्लोरिक अम्ल 

ॲसिटिक क्लोराइड 

 

 

 

 

बहुतेक सर्व कीटिनांचे बहुवारिकीकरण (अनेक रेणू एकत्र येऊन मोठा रेणू बनण्याची विक्रीया) सुलभतेने घडते. कीटिनापासून अशा प्रकारच्या द्विवारिकीकरणाने (दोन रेणू एकत्र येऊन नवीन रेणू बनण्याच्या विक्रियेने) डायकीटीन बनते.

26-3

डायकीटिनापासून अल्कोहॉलांच्या विक्रियेने ॲसिटोॲसिटिक एस्टरे औद्योगिक प्रमाणावर बनविली जातात.

 

26-4

 

कीटीन आणि त्याचे मोनो-अल्किल व मोनो-अरिल अनुजात (मूळ पदार्थापासून तयार केलेले दुसरे संयुग) हे अल्डो-कीटीन वर्गात पडतात. हे वर्णहीन असून त्यांचे स्वयं-ऑक्सिडीकरण [→ ऑक्सिडीभवन] होत नाही. पिटिडिनामुळे त्यांचे बहुवारिकीकरण होते. या उलट कीटो-कीटिने,कीटिनाचे डाय-अल्किल व डाय-अरिल अनुजात रंगीत असतात. त्यांचे स्वयं-ऑक्सिडीकरण होते व पिरिडीन, क्विनोलीन ॲक्रिडीन इ. अतृप्त नायट्रोजन संयुगांबरोबर त्यांच्या समावेशक विक्रिया होतात.

 

पहा: आल्डिहाइडे कीटोने.

 

संदर्भ: 1. Kipping, F.S.  Kipping, F.B. Organic Chemistry, London, 1961.

    2. Packer, J. Vaughan, J. A Modern Approach to Organic Chemistry, London, 1958. 

 

देशपांडे, ज. र.