गोंडी बोली : गोंडी ही द्राविडी भाषांच्या आदिवासी बोलींपैकी सर्वांत मोठी बोली आहे. ती मुख्यतः मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व ओरिसा या राज्यांत बोलली जाते. १९६१ च्या जनगणनेप्रमाणे गोंडी बोलणाऱ्यांची संख्या १३,८४,३२१ होती. त्यांपैकी ९,७३,०९४ मध्य प्रदेशात ३,१४,८६३ महाराष्ट्रात ७५,४११ आंध्र प्रदेशात २०,०८७ ओरिसात व बाकीचे भारताच्या इतर काही राज्यांत होते.

गोंडीची अनेक स्थानिक रूपे असून ती एकमेकांपासून बरीच भिन्न आहेत. त्यांपैकी ‘आदिलाबादी’ व ‘कोया’ यांचा अभ्यास झालेला असून इतरांचा व्हायचा आहे. गोंडीचा पाया द्राविडी असला, तरी तिच्या शब्दसंग्रहात मात्र इंडो-आर्यनचे प्रमाण बरेच आढळते.

ध्वनिविचार : गोंडीची ध्वनिव्यवस्था पुढीलप्रमाणे आहे : 

स्वर (ऱ्हस्व) : अ, इ, उ, ए, ओ.

        (दीर्घ) : आ, ई, ऊ,एऽ, ओऽ

        व्यंजने :, ख, ग, घ, ङ, च, छ, ज, झ, ट, ठ, ड,

              ड़, ढ, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म,

               य, र, ल, व,, ह

(खुलासा : १ सर्वत्र, २ फक्त शब्दारंभी,  ३ शब्दारंभी व शब्दाच्या मध्यभागी, ४ शब्दाच्या मध्यभागी व शब्दान्ती, ५ फक्त शब्दाच्या मध्यभागी).

रूपविचार : रूपविचारात नाम, सर्वनाम, क्रियापद व संबंधित शब्द असे वर्गीकरण करण्यात येते. संबंधित शब्दांत ‘मुक्त’ व ‘बद्ध’ (दुसऱ्या शब्दाला जोडून येणारे) असे दोन प्रकार आहेत.

नाम : नाम पुल्लिंगी किंवा इतर लिंगी असते. त्यांची अनेकवचने पुल्लिंगी नामाला – र्, -ईर् किंवा -ऊर् आणि इतर लिंगी नामाला -ङ्, -ईक्, -क् किंवा शून्य यांपैकी एक ठराविक प्रत्यय लागून होतात : पुल्लिंगी कांडी ‘मुलगा’ – कांडीर्, कल्ले ‘चोर’ – कल्लीर्‌, अक्को ‘आईचा बाप’ – अक्कूर्‌ इतर लिंगी काया ‘कच्चे फळ’ – कायाङ्, गंडाल् ‘गिधाड’ – गंडलीक्, मीन ‘मासा’ – मीन्क्, शून्य प्रत्यय स्वरांत अमानव नामानंतर व ‘न्’ ने सुरू होणाऱ्या प्रत्ययापूर्वी येतो.

विभक्तिप्रत्यय वा शब्दयोगी अव्यये नामाच्या सामान्यरूपानंतर येऊ शकतात. सामान्यरूपाचे प्रत्यय ‘ट्, त्, द्, न्’ व ‘शून्य’ हे आहेत. 

सर्वनाम : पुरुषवाचक सर्वनामे नन्ना ‘मी’, मराट् ‘आम्ही’, निम्मेऽ ‘तू’, मिराट् ‘तुम्ही’ ही आहेत. दर्शक सर्वनामे पुल्लिंगी वेऽर्‌ (समीप), वोऽर्‌  (दूर), बोऽर्‌  (प्रश्नार्थक) — अ. व. वीर्, वूर्‌, बूर् इतर लिंगी इद्, अद्, बद् — अ.व. इव्, अव्, बव्.

संख्यावाचक : पहिली सात संख्यावाचके द्राविडी असून इतर सर्व मराठीतून घेतलेली आहेत. ते पुल्लिंगी आहे असे दाखवायचे असल्यास, त्यानंतर- झन्क् व इतर लिंगी असल्यास- झनिक् हा प्रत्यय लावण्यात येतो. सर्व क्रमवाचके मराठीतून घेतली आहेत.

क्रियापद : क्रियापदांची रूपे कालवाचक व सर्वनामवाचक प्रत्यय लावून होतात. उदा., अट्ट ‘शिजवणे’ या धातूची काही रूपे खालील तक्त्यात दिली आहेत.

             वर्तमान-भविष्य                                      भविष्य                                                  भूत 

ए. व. 

अ. व. 

ए. व. 

अ. व. 

ए. व. 

अ. व. 

अट्टान्तोन् 

अट्टान्तोऽम् 

अट्‌का 

अट्‌कोsम्

-अट्‌काट् 

अड़्‌तोsन्

अड़्‌तोsम्

अट्टान्ती

अट्टान्तीट्

अट्‌की

अटकीट्

अड़्‌ती 

अड़्‌तीट् 

अट्टान्तोsर्

अट्टान्तेsर्

अट्टानूर्

अट्टानीर्

अड़्‌तोsर्

अड़्‌तेsर्

अट्टान्ता 

अटान्तान् 

अट्टार् 

अट्टानूङ् 

अड़्‌ता 

अड़्‌ताङ् 

तृतीय पुरुषात पहिले रूप पुल्लिंगी व दुसरे इतर लिंगी.

प्रथम पुरुष अनेकवचनात पहिले रूप वर्जक (आम्ही) आणि दुसरे समावेशक (आपण).

काही वाक्ये : सीयोऽन् — ‘मी देणार नाही’ नन्ना नड़ी सोन्नोन् — ‘मी उद्या जाणार नाही’ अट्मा — ‘शिजवू नको’ उज्‌डेऽमाता — ‘उजाडले’ वेऽर् राडान् खडियाल् वोऽयी ते — ‘त्या मूर्खाला वाघ घेऊन जावो! ’

संदर्भ : Subrahmanyam, P. S. A Descriptive Grammar of Gondi, Annamalinagar, 1968. 

कालेलकर, ना. गो.