गुमुशाने : तुर्कस्तानातील गुमुशाने विभागाचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ८,०९२ (१९६५). तुर्की भाषेतील ह्याचे नाव गुमुशखानेह असे आहे. ट्रॅबझॉनच्या दक्षिणेस ६४ किमी. खार्शूत-सूच्या खोऱ्यात, हारशीट नदीवर समुद्रसपाटीपासून १,२५० मी. उंचीवर हे शहर वसले आहे. ह्या शहराच्या आसमंतात पूर्वी चांदीच्या खाणी होत्या. सफरचंद व पेअर ही प्रमुख उत्पन्ने असून बटाटे व धान्ये यांचा येथे व्यापार चालतो. याच्या पश्चिमेस ४० किमी.वर ३,१४५ मी. उंचीचा गुमुशाने पर्वत आहे.           

लिमये, दि. ह.