गुजराणवाला : पाकिस्तानच्या पंजाब विभागातील गुजराणवाला जिल्ह्याचे मुख्य ठाणे. लोकसंख्या २,८९,३०० (१९६९ अंदाज). हे लाहोर — पेशावर मार्गावर लाहोरच्या जवळजवळ उत्तरेस ६७ किमी. आहे. हे प्रसिद्ध व्यापारी शहर असून गहू, तांदूळ, साखर, तेलबिया व नारिंगांचा मोठा व्यापार येथे चालतो. तिजोऱ्या, भांडी, तेल, कापड, कपडे, होजिअरी, विद्युत्‌ उपकरणे, कातडी सामान इत्यादींचे कारखाने येथे आहेत. रणजितसिंगाच्या कारकीर्दीत याचे महत्त्व वाढले. गुजराणवाला रणजितसिंहाचे जन्मस्थान असून येथे त्याचे व त्याचा पिता महानसिंगाचे स्मारक आहे.

ओक, द. ह.