ओनिचा : नायजेरियाच्या पूर्व भागातील व्यापारी शहर. लोकसंख्या सु. १,८९,०६७ (१९६९). नायजर व अनांब्रा ह्या नद्यांच्या संगमावर वसलेले हे शहर खुष्कीचे आणि जलवाहतुकीचे महत्त्वाचे केंद्र आहे. ताडफळे व त्यांचे तेल, कोलानट्स, मका, याम, कॅसाव्हा, आयात कापड इत्यादींची ही मोठी व्यापारपेठ आहे. येथे महारोग्यांची वसाहत असून महारोग नियंत्रण केंद्र, स्त्रीशिक्षकांसाठी महाविद्यालय इ. संस्था आहेत.

लिमये, दि. ह.