एल् ओबेद : सूदानच्या कोर्दोफॅन प्रांताची राजधानी. लोकसंख्या ६६,२७० (१९६९). हे खार्टूमच्या नैर्ऋत्येस ३६८ किमी., सु. ५७० मी. उंचीच्या एका मरुपठारावर वसले असून, वाळूच्या वादळांचा त्रास होऊ नये म्हणून शहराभोवती जंगले उभारली आहेत. येथे विमानतळ असून खार्टूमहून लोहमार्गाचा फाटा येथपर्यंत आला आहे. याशिवाय येथून अनेक ठिकाणी सडकांनी वाहतूक चालते. आसमंतातील लोकवस्तीची ही महत्त्वाची बाजारपेठ आहे.

शाह, र. रू.