निसर्गरम्य पहलगाम

पहलगाम : जम्मू व काश्मीर राज्याच्या अनंतनाग जिल्ह्यातील सृष्टिसौंदर्य व उत्साहवर्धक हवा यांसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण. हे श्रीनगरच्या पूर्वेस सु. ९५ किमी. वर, लिद्दार नदीशेजारील खोऱ्यात सु. २,१३४ मी. उंचीवर वसले आहे. लोकसंख्या २,३३५ (१९७१). याच्या सभोवती हिमालयाची बर्फाच्छादित शिखरे, तर याच्या आसमंतात उंच वृक्ष, हिरवळीची मैदाने आणि पाण्याचे पाट दिसतात. श्रीनगर-पहलगाम मोटरमार्ग असून तेथून पुढे मात्र खेचरमार्गाने जावे लागते. पहलगामपासून सनसर, शेषनाग ही सरोवरे, व्हेरनाग झरा इ. ठिकाणी सफरीसाठी जाता येते.

  

दातार, नीला