एल् ॲलामेनची लढाई : १३ ऑक्‍टोबर ते २ नोव्हेंबर १९४२. दोस्त सैन्याचा जनरल मंगमरी व उत्तर आफ्रिकेतील जर्मन सेनेचा फील्ड मार्शल रोमेल यांच्या सैन्याचे ईजिप्तमधील नाईल नदीतीरावरील एल् ॲलामेन गावाच्या परिसरात झालेले युद्ध. रोमेलचा येथे पराभव झाला व जर्मनीचे बारा जनरल व सात हजार सैनिक कैदी झाले. याउलट दोस्त सैन्याचे सातशे अधिकारी व दहा हजार सैनिक कामास आले. दोस्त सैन्याच्या पीछेहाटीस पायबंद बसून त्याचे मनोधैर्य उंचावले. भौगोलिक परिस्थितीच्या जोडीस शस्त्रास्त्रबळात असलेला उणेपणा दूर करून शत्रूवर मात केल्याने मंगमरीच्या कर्तृत्त्वाचा पाया घातला गेला व दोस्तांचे आक्रमणपर्व सुरू झाले.

बाळ, नि. वि.