कुलपाक : आंध्र प्रदेश राज्यातील एक जैन तीर्थक्षेत्र. हे सिकंदराबाद–वरंगळ लोहमार्गावर सिकंदराबादपासून सहा किमी. अंतरावर आहे. येथील ऋषभदेवाचे मंदिर माणिकस्वामी नावाने ख्यात असून जैन आख्यायिकांनुसार ही प्रतिमा रावणपत्‍नी मंदोदरीने सिंहलद्वीपात नेली होती, ती कलचुरी नरेश शंकर याच्या पत्‍नीने आणविली आणि नरेशाने आपल्या पत्‍नीसाठी येथे मंदिर बांधले. कुल्यपाक, कोल्लपाक या नावांनी हे तीर्थक्षेत्र प्राचीन जैन साहित्यात प्रसिद्ध आहे.

शाह, र. रू.