कीकटएक प्राचीन देश, या गोधनसमृद्ध देशाचा व त्यातील अनार्य लोकसमूहास आर्यांनी पराजित केल्याचा ऋग्वेदात उल्लेख आहे, त्यावरून हा देश पंजाबमध्ये असावा असे मानले जाते. परंतु महाभारत, अभिधानचिंतामणी अशा नंतरच्या ग्रंथांवरून कीकट-तिकट-टिकट व मगध हे समानार्थी असून मगधाचा काही भाग, आधुनिक बिहारमधील गया व पाटणा या जिल्ह्यांचा प्रदेश म्हणजेच प्राचीन कीकट देश होय, असे काहींचे मत आहे.  कदाचित ही कीकटांची  एक वसाहतही असू शकेल. राजवाड्यांच्या मते कीकट म्हणजे कैकाडी  लोक असून कीकट देश हेच आधुनिक जिप्सी लोकांचे मूळ स्थान होय. येथील वैकुंठ, लोहदंड, गृध्रकूट आणि शोणक ही स्थाने श्राद्धकर्मासाठी पवित्र मानली जात.

 

जोशी, चंद्रहास