कादिमाइन : मध्य इराकच्या बगदाद प्रांतातील टायग्रिस नदीवरील शिया मुसलमानांचे पवित्र स्थळ. लोकसंख्या १,२६,४४३ (१९५७). हे बगदादच्या वायव्येस ८ किमी. असून येथे १५१५च्या सुमाराय पर्शियन शैलीमध्ये बांधलेली चार मिनारांची व दोन सोनरी घुमटांची एक प्रसिद्ध मशीद आहे. ती सातव्या व नवव्या इमामांचे पवित्र स्थान मानतात. शहरात एक कापड गिरणी असून तीळ, खजूर व इतर फळे ह्यांचा येथे मोठा व्यापार चालतो.

गद्रे, वि. रा.