कुल्टी : पश्चिम बंगाल राज्याच्या बरद्वान जिल्ह्यातील औद्योगिक उपनगरासह केंद्र. लोकसंख्या ४४,२८९ (१९७१). दामोदर खोऱ्यातील राणीगंज कोळसाक्षेत्रात हे आसनसोलच्या वायव्येस १४ किमी. आहे. येथे इंडियन आयर्न अँड स्टील कंपनीचा मोठा कारखाना असल्याने, कुल्टीस महत्त्व आहे. या कारखान्याशिवाय येथे विटा, कौले, चिनी मातीची फरशी इत्यादींचे कारखाने आहेत.

ओक, शा. नि.