कोटरी : पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील तालुक्याचे शहर. लोकसंख्या २०,२६२ (१९६१). हे सिंधूच्या पश्चिम तीरावर, कराचीच्या ईशान्येस रेल्वेने १६८ किमी. व सडकेने १९२ किमी. आहे. सिंधूच्या पूर्व तीरावरील हैदराबादशी (कोटरीपासून ९ किमी.) हे १९०० मध्ये १०७ मी. लांबीच्या पूलाने जोडले असून, कोटरीहून सिंधूच्या पश्चिम बाजूस व पूर्व बाजूस लोहमार्ग फुटतात. कोटरीपासून सात किमी. वर सिंधूवर गुलाम महंमद बंधारा बांधला असून त्यामुळे कोटरीचा आसमंत समृद्ध बनला आहे.

ओक, द. ह.