खैरपूर : पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील खैरपूर जिल्ह्याचे मुख्य ठाणे व पूर्वीच्या खैरपूर संस्थानाच्या राजधानीचे शहर. लोकसंख्या ३४,१४४ (१९६१). कराची–लाहोर रेलमार्गावर हे कराचीच्या ईशान्येस ४४८ किमी. असून कराची–सक्कर महामार्गही खैरपूरहून जातो. १७८३ मध्ये तालपूरच्या मीरांनी खैरपूरची स्थापना करून ती आपली राजधानी केली. खैरपूर संस्थानाच्या विलीनीकरणानंतर याचे महत्त्व कमी झाले, तरी अद्यापही ते सिंधमधील एक प्रमुख शहर आहे. गहू, कापूस, तंबाखू आणि खजुराच्या व्यापारासाठी खैरपूर प्रसिद्ध असून हातमाग कापड, गालिचे, किरकोळ हत्यारे व औषधे येथे होतात.

ओक, द. ह.