पिप्री : उत्तर प्रदेश राज्याच्या मिर्झापूर जिल्ह्यातील एक गाव. लोकसंख्या ५,७०० (१९७१). मिर्झापूरच्या दक्षिण-आग्नेयीस सु. १६०किमी. वर मध्य प्रदेश राज्याच्या हद्दीजवळ वसलेल्या या गावाजवळ चरिहांड नदीवर प्रचंड बहुद्देशीय धरण बांधले आहे. जलसिंचन व जलविद्युत् पुरवठ्याबाबत उत्तर प्रदेशाबरोबरच मध्य प्रदेश व बिहार या राज्यांच्या दृष्टीनेही हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. या धरणामुळे निर्माण झालेला गोविंदवल्लभ पंत हा प्रचंड जलाशय उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांमध्ये पसरला आहे. येथे ५०,०००किवॉ. क्षमतेचे सहा-शाखीय रिहांड जलविद्युत् निर्मिती केंद्र व अँल्युमिनियम कारखाना आहे.

पहा  :  रिहांड.

चौधरी, वसंत.