पित्ताश्मरी :पित्तरसातील [→ पित्तरस] पित्तरंजक, कॅल्शियम व ⇨ कोलेस्टेरॉल या घटकांचे अवक्षेपण होऊन (न विरघळणाऱ्या घन पदार्थांत रुपांतर होऊन) पित्तमार्गात जे खड्यासारखे गोळे बनतात, त्यांना ‘पित्ताश्मरी’ म्हणतात. एके काळी हा विकार स्थूल शरीराच्या, जननक्षम, उदरात नेहमी वायू होणाऱ्या पन्नाशीच्या स्त्रीमध्ये बहुतकरून आढळतो, असे वर्णन केले जात असे. आज बदलत्या काळानुसार प्रथम प्रसवेच्या प्रसूतिपश्च काळात, विशेषेकरून गर्भारपणात संततिप्रतिबंधक गोळ्या घेणाऱ्या स्त्रियांत या विकाराचे अधिक प्रमाण आढळू लागले आहे. तरीदेखील हा विकार कोणत्याही वयाच्या स्त्री-पुरुषांत आणि बालवयातही आढळू शकतो. वृध्दावस्थेत त्याचे प्रमाण २०% एवढे वाढते. एकूण स्त्रियांमध्ये त्याचे प्रमाण जननक्षम वयोगटात २०% एवढे वाढते. नित्यक्रमात करण्यात येणाऱ्या शवपरीक्षांमध्ये पित्ताश्मरीचे प्रमाण २० ते २५ % आढळते.

पित्ताश्मरीचा बहुसंख्य पित्तमार्ग विकारांशी संबंध असतो. अमेरिकेतील दीड कोटी लोकांना पित्ताश्मरी असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून तेथे या विकाराच्या उपचारासाठी दरवर्षी जवळ जवळ ३,५०,००० रुग्णांवर पित्ताशयोच्छेदन (पित्ताशय संपूर्ण पणेकाढून टाकण्याच्या) शस्त्रक्रिया केल्या जातात. पश्चिम यूरोप आणि युनायटेड किंग्डम या भागात ही पित्ताश्मरीचे प्रमाण अधिक आहे. उष्णकटिबंधीय प्रदेशातून याविकाराचे प्रमाण कमी आढळते. भारतात दक्षिणे पेक्षा उत्तर भागात त्याचे प्रमाण अधिक आहे.

कारणे : पित्ताश्मरीचा विकार ४,००० वर्षां पेक्षाही अधिक पूर्वीपासून ज्ञात असून सुध्दा त्याचे निश्चितकारण अद्याप अज्ञात आहे. काहींच्या मताप्रमाणे हा विकार कौटुंबिक स्वरूपाचा असून त्याला आनुवंशिकता कारणीभूत असावी. याची आहारजन्य व पोषणजन्य कारणे ही असावीत.

पित्ताश्मरी तयार होण्यास पुढील कारणे मदत करीत असावीत.

चयापचयात्मक : ⇨ चयापचयाचा  व कोलेस्टेरॉलाच्या विद्राव्यतेचा (विरघळण्याच्या क्षमतेचा) घनिष्ट संबंध आहे. पित्ताम्ले कोलेस्टेरॉलापासून यकृतात तयार होतात. पित्ताम्ले व कोलेस्टेरॉल यांचे प्राकृतिक (सर्वसाधारणत: आढळणारे) प्रमाण २५ : १ असते. हे प्रमाण जेव्हा १३ : १ होते  तेव्हा अवक्षेपणाची शक्यता उत्पन्न होते. कोणत्याही कारणामुळे [उदा., यकृतविकृती, शेषांत्रोच्छेदन (शेषांत्र लहान आतड्याचा शेवटचा ३/५ भाग-काढून टाकल्यामुळे पित्ताम्लांच्या नेहमीच्या आंत्र-यकृत अभिसरणात व्यत्यय येतो )] पित्ताम्ले कमी पडताच वरील प्रमाण बदलते. अशा पित्ताम्ले कमी असणाऱ्या पित्तरसाला ‘अश्मरी उत्पादक’ पित्तरस म्हणतात. त्यातील कोलेस्टेरॉल विद्राव्य अवस्थेतन राहू शकल्यामुळे त्याचे अवक्षेपण होते व ‘कोलेस्टेरॉल पित्ताश्मरी’ तयार होतो. 

सूक्ष्मजंतु–संक्रामण : स्ट्रेप्टोकोकाय, कॉलिफार्मबॅसिलाय, टायफॉइडबॅसिलायॲक्टिनोमायसीजइ. सूक्ष्मजंतू पुष्कळ वेळा पित्ताश्मरीच्या गाभ्यात आढळतात. हे सूक्ष्म जंतू पित्ताशया पर्यंत रक्त प्रवाहातून पोहोचतात किंवा आंत्रमार्गातून (आतड्याच्या मार्गातून) लसीका वाहिन्यांतूनही (ऊतकांकडून–समानरचना आणि कार्य असणाऱ्या पेशी समूहांकडून–रक्तात मिसळणाराव रक्तद्रवाशी साम्य असणारा द्रव पदार्थ वाहून नेणाऱ्या वाहिन्यांतूनही) तेथे जातात. तेथे शोथ (दाहयुक्त सूज) उत्पन्न करतात आणि या शोथ जन्य पदार्थावर (मृतश्लेष्मकोशिका, मृतसूक्ष्मजंतू वगैरे) पित्ताश्मरी बांधला जातो. कधी कधी जंताच्या अंड्याभोवती पित्ताश्मरी तयार होतो. क्वचित वेळा टोमॅटोच्या सालीचा तुकडा किंवा इतर बाह्य पदार्थावरही पित्ताश्मरी तयार झाल्याची उदाहरणे आहेत.

पित्तरसस्तंभन : पित्तरस पित्ताशयातून बाहेर पडण्यास नेहमीपेक्षा विलंब लागल्यास तो काही काळापर्यंत तेथेच साचून राहतो, याला स्तंभन म्हणतात व ते पित्ताश्मरी बनविण्यास मदत करते. गर्भारपणात स्तंभन अनेक वेळा होते. बहु प्रसवास्त्रियांतील पित्ताश्मरींच्या जादा प्रमाणाचे हे एक कारणअसावे. याशिवाय पित्ताशयातील पित्तरस आणि त्यात जमा होण्याकरिता येणारा पित्तरस यांच्या विशिष्ट गुरुत्वातील फरकामुळे थरा वर थर तयार होतात.

रचना व प्रकार : पित्तरसतील घटकांपासून पित्ताश्मरी बनतात. 

कोलेस्टेरॉल, मोनोहायड्रेट कॅल्शियम कार्बोनेट आणि कॅल्शियम बिलिरुबिनेट हे घटक पित्ताश्मरी उत्पन्न होण्यात प्रमुख असतात. यांशिवाय काही अकार्बनी कॅल्शियम लवणे, काही  कार्बनी पदार्थ व प्रथिनेही पित्ताश्मरी तयार होण्यात भाग घेतात. बहुतेक पित्ताश्मरी  कोलेस्टेरॉल व कॅल्शियम बिलिरुबिनेट यांच्या एका आड एक असलेल्या थरांचे बनतात. रक्तविलयन जन्य (रक्ताती ल तांबड्या पेशीं पासूनरक्ता रुण म्हण जेही मोग्लोबिनअलग होण्यामुळे निर्माणहोणाऱ्या) विकृतीत ⇨ पित्तारुणाचे प्रमाण वाढून या पित्तरंजकापासून पित्ताश्मरी तयार होतात. शुध्द कोलेस्टेरॉल किंवा शुध्द पित्तरंजक पित्ताश्मरी फार कमी प्रमाणात आढळतात. पित्ताश्मरींचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत (आ.१). 

आ. १. पित्ताश्मरींचे प्रकार व अंतर्रचना : (अ) शुध्द कोलेस्टेरॉल पित्ताश्मरी (आ) पित्तरंजक पित्ताश्मरी (इ) पत्रित मिश्र पित्ताश्मरी (ई) पैलूदार मिश्र पित्ताश्मरी.

(१) शुध्द कोलेस्टेरॉल पित्ताश्मरी :

क्वचित आढळणारा हा प्रकार कोलेस्टेरॉल अवक्षेपणा पासून बनतो. बहुधा एकटाच आढळणारा हा पित्ताश्मरी १ ते ४ सेंमी. व्यासाचा, आकाराने अंडाकृती किंवा गोल असतो. तो वजनाने हलका असून त्याचा रंग फिक्कट पिवळा असतो. तो कापल्यास त्याचा अंतर्भाग कोलेस्टेरॉल स्फटिकांच्या अरीय रचनेचा  बनलेला  दिसतो. अपारदर्शी नसल्यामुळे तो साध्या क्ष-किरण चित्रणात दिसत नाही. एकूण पित्ताश्मरींमध्ये याचे प्रमाण  ६% असते. 

(२) पित्तरंजक पित्ताश्मरी : फक्त कॅल्शियम बिलीरुबिनेटापासून हा पित्ताश्मरी बनतो. बहुधा अनेक पित्ताश्मरी असतात. ५ मिमी. ते अगदी बारीक वाळूच्या खड्याच्या आकारमानाचे हे अश्मरी रंगाने काळे किंवा काळपट हिरवे असतात. आकाराने ओबडधोबड असून अंतर्भाग अस्फटिकी असतो. ते साध्या क्ष-किरण चित्रणात दिसत नाहीत. त्यांचे प्रमाण १२% असते.


(३) मिश्र पित्ताश्मरी : पित्तरसातील कोलेस्टेरॉल, पित्तरंजके, कॅल्शियम लवणे व प्रथिने मिळून बनलेल्या या प्रकारात बहुधा अनेक पैलूदार अश्मरी असतात. या प्रकारचे दहा ते शंभरापर्यंत पित्ताश्मरी पित्ताशयात कोंबून भरल्यासारखे दिसतात. त्यांच्या एकमेकांवरील घर्षणाने व दाबामुळे त्यांना पैलू पडतात. कापल्यास अंतर्रचना पत्रित (एकावर एक पातळ थर रचल्यासारखी) दिसते. साध्या क्ष-किरण चित्रणात ते दिसू शकतात. यांचे प्रमाण ८० % असते.

स्थाने व लक्षणे : पित्तमार्गात पित्ताश्मरी हे पित्ताशय, पित्ताशय नलिका, यकृत नलिका, समाईक पित्तनलिका किंवा फाटर कुंभिकेत [→ पित्ताशय] सापडू शकतात (आ. २).

पित्ताशयातील पित्ताश्मरी आपली जागा सोडून पित्ताशय नलिकेत किंवा समाईक पित्त नलिकेत उतरताना अडकून पडल्यास किंवा पित्ताशय शोथ (पित्ताशयाची दाहयुक्तसूज) उत्पन्न झाल्यास च रोग-लक्षणे उद्‌भवतात. लक्षणविरहीत पित्ताश्मरींना  ‘मूक पित्ताश्मरी’ म्हणतात. असे पित्ताश्मरी क्ष-किरण तपासणीत, उदर गुहीय शस्त्रक्रियेच्या वेळी किंवा शव परीक्षेत दिसतात. मूक पित्ताश्मरी असलेल्या व्यक्तीं पैकी फारच थोड्यांना पुढे लक्षणे उद्‌भवतात. वर सांगितल्या प्रमाणे पित्ताश्मरी पुढे सरकल्या नंतर होणाऱ्या प्रतिक्रियेच्या गंभीरते नुसार तीव्र किंवा चिरकारी (दीर्घकालीन) पित्ताशयशोथ उत्पन्नहोतो. तत्संबंधी लक्षणे ‘पित्ताशय’ नोंदीत दिलेली आहेत.

आ. २. पित्तमार्गातील पित्ताश्म- रींची स्थाने : (१) पित्ताशय, (२) पित्ताशय नलिका, (३) समाईक पित्तनलिका, (४) फाटर कुंभिका, (५) यकृत नलिका.

कधी कधी पित्ताशयातून पित्ताश्मरी पित्ताशय नलिकेत सरकताना किंवा नलिकेतून आणखी पुढे सरकताना ‘पैत्तिकशूल’ उद्‌भवतो. त्यामुळे तीव्र, जोरदार, टिकून राहणाऱ्या वेदना बहुत करून अधि जठर भागात मध्यावर होतात. कधी कधी त्यासबंध उदरगुहे भर पसरलेल्या असतात आणि उजवा खांदा किंवा पाठीची उजवीवर ची बाजू या ठिकाणी अन्य त्र वेदना (अन्य ठिकाणी उद्‌भवणाऱ्या वेदना) होतात.

पैत्तिक शूल बहुधा संध्याकाळ च्या जेवणा नंतर रात्री अंथरुणात टेकल्यानंतर सुरू होतो व सर्व साधारण पणे १ ते ४ तास टिकतो.  यावेळी मळमळणे व उलटया होतात.  वेदनांं नंतर ४८ तासांच्या आतच कावीळ उत्पन्न होते. मूत्र गडद रंगाचे व मल पांढुर का फिक्कट दिसतो. कधी कधी पित्ताश्मरी सतत अडकून न बसता अधून मधून मोकळात रंगतो. अशा वेळी पैत्तिक शूल, कावीळ आणि थंडी वाजून ताप येणे हील क्षणे विरामी (राहून राहून पुन्हा उद्भवणाऱ्या ) स्वरूपात दिसतात. यालक्षणांना जे. एम्. शार्को  (१८२५–९३) या फ्रेंच शास्त्रज्ञांच्या नावावरुन ‘शार्कोत्रिक’ म्हणतात. पित्ताश्मरी चे रोगी अधून मधून अधिजठर भागाची  अस्वस्थता,  अपचनइ.  तक्रारी विशेषे करून व सायुक्त अन्न सेवना नंतर करीत असतात.

आ. ३. पित्ताश्मरीचे उपद्रव : (अ) अंतर्घट्टन (आ) अर्बुदोत्पती (इ) अग्निपिंडशोथ (ई) छिद्रण (उ) चिरकारी अपचन व पैत्तिक शूल.

उपद्रव: (अनुषंगाने होणारे इतरविकार). पित्ताश्मरी पासून पुढील उपद्रव उद्‌भवण्याचा संभव असतो  (आ. ३).

(अ) अंतर्घट्टन (नलिकेच्या पोकळीत घट्ट अडकणे) : (१) पित्ताशय नलिकेत : तीव्र पित्ताशयशोथ, पूयपित्ताशय (पित्ताशयात पू साचणे), पित्ताशय श्लेष्मरस (बुळबुळीत द्रव) संचय. (२) समाईक पित्तनलिकेत : रोधजन्य कावीळ, तीव्र पित्तवाहिनीशोथ, निकोचन (वाहिनीची पोकळी अरुंद होणे), दुय्यम पैत्तिक यकृत-सूत्रण [⇨यकृत-सूत्रण रोग]. (आ) अर्बुद उत्पन्न होणे : (नवीन पेशींच्या अत्यधिक वाढीमुळे शरीरक्रियेला निरुपयोगी असणारी गाठ उत्पन्न होणे). पित्ताशयाचा कर्करोग. (इ) अग्निपिंडशोथ : उदराच्या वरच्या भागात असलेल्या व पचनक्रियेत महत्त्वाचे स्थान असलेल्या ⇨ अग्निपिंड या ग्रंथीचा शोथ. (ई) छिद्रण : (१) पैत्तिक पर्युदरशोथ (उदरातील इंद्रियांवर पसरलेल्या पातळ पटलाचा शोथ). (२) आंत्रावरोध (शोथामुळे लघ्वांत्र-लहान आतडे – आणि पित्ताशय एकमेकांस चिकटून कालांतराने छिद्रणाने एखादा मोठा पित्ताश्मरी लघ्वांत्रात अडकून बसणे). (उ) चिरकारी अपचन व पैत्तिक शूल.

चिकित्सा :पित्ताश्मरीच्या चिकित्से विषयी  मतभिन्नता आहे. काहींच्या मताप्रमाणे मूक पित्ताश्मरी वर इलाज करण्याची गरज  नाही, तर काहींच्या मते  पित्ताशयोच्छेदन नेहमीच उपयुक्त असते. पित्ताश्मरी जन्य कोणतीही विकृती उद्‌भवल्यास विशेषे करुन पैत्तिक  शूलाचे निश्चित निदान झाल्यास, पित्ताशयोच्छेदनहा एकमेवइलाज असतो. शस्त्रक्रिया शक्यतो तीव्र व गंभीर अवस्था  टळल्यानंतर आणि हृदय, मूत्रपिंडे, यकृत यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांच्या संपूर्ण तपासणी नंतरच करतात. ज्या रोग्यावर कोणत्याही कारणामुळे शस्त्रक्रिया करणे धोक्याचे असते त्याच्यावर औषधी उपचार करतात.

चिनोडी-ऑक्सिकोलिकअम्ल (एकप्राथमिकपित्ताम्ल) त्याच्या सोडियम लवणाच्या स्वरूपात दररोज एक ग्रॅ. तोंडाने दिल्यास काही दिवसांनंतर पित्ताश्मरी (मुख्यत्वेकरून कोलेस्टेरॉल पित्ताश्मरी) विरघळून नष्ट होतात, असे अलीकडील संशोधनानंतर आढळून आले आहे परंतु हा उपचार सतत दोन वर्षांपर्यंत करावा लागत असून त्याकरिता पित्ताशयाचे कार्य प्राकृतिक (सर्वसाधारण) असणे, पित्ताश्मरी संख्या कमी असणे, तसेच त्यांचा आकार लहान असणे या  गोष्टी आवश्यक असतात. यांशिवाय या औषधा मुळे यकृत विकृती व कोलेस्टेरॉलाच्या प्राकृतिक  चयापचयात [→चयापयच]  बिघाड उत्पन्न होण्याचा धोका असतो.  या  औषधा विषय़ी अमेरिकेतील संयुक्त संस्थानांत  अधिक संशोधन चालू आहे.

ढमढेरे, वा. रा.  भालेराव, य. त्र्यं.

आर्युर्वेदीयवर्णन व चिकित्सा : यकृतामध्ये पित्ताच्या पिशवीत पित्त घट्ट होऊन त्याचा खडा बनतो.  अतिशय शूल होतो. ही विकृती रक्तधातूच्या दुष्टीमुळे होते. उपचार-पित्त जमुत्रा श्मरीची सर्व चिकित्सा करावी  [→ शल्य तंत्र व शल्य शालाक्य] .  ताम्र भस्म, रौप्य भस्म, नवसागर, आघाड्याचा क्षार, केळी चा क्षार, सुवर्ण मालिनी  वसंत ही औषधे प्रकृतीचा व चिन्हांचा विचार करून द्यावी.  सुवर्ण मालिनी व संताने अ ग्नि पिंडाच्या स्रोत सा मधीलअश्मरी नष्टझाल्याचा अनुभव आहे. अश्मरी मोठा झाल्यास शस्त्रक्रियेनेच काढावा.

पटवर्धन, शुभदा अ.

संदर्भ : 1. Beeson, P. B. McDermott, W., Ed. Textbook of Medicine, Philadelphia, 1975.

      2. Rains, A.J.H. Ritchie, H. D., Ed.Bailey and Love’s Short Practice of Surgery, London, 1977.

      3. Scott, R. B., Ed. Price’s Textbook of the Practice of Medicine, London, 1973.