पाताल : पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील ठठ्ठा हे गाव म्हणजे प्राचीन पाताल असे मानतात तथापि याविषयी विद्वानांत मतभेद आहेत. याचा उल्लेख पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी या ग्रंथात व प्राचीन ग्रीक इतिहासकार आरिआनॉसच्या इंडिकामध्ये आढळतो. आरिआनॉसने सिंधू नदीच्या त्रिभुज प्रदेशालाही पाताल म्हटले आहे. ईजिप्तची जहाजे पत्तल बंदरात म्हणजे याच ठिकाणी येत, असा उल्लेख आहे. अवदान कल्पलता या क्षेमेंद्राच्या संस्कृत ग्रंथात पाटलग्राम निर्दिष्ट आहे, ते हेच असावे. ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ कनिंगहॅमच्या मते सिंध प्रांतातील हैदराबाद म्हणजे पाताल होय.
खरे, ग. ह.