पांडू: आसाम राज्याच्या कामरूप जिल्ह्यातील एक अंतर्गत बंदर व रेल्वे प्रस्थानक. लोकसंख्या उपनगरांसह ४७,९५४ (१९७१). हे गौहातीच्या पश्चिमेस ६ किमी. ब्रह्मपुत्रेच्या डाव्या तीरावर वसले आहे. १९५८ पासून बिहारमधील कटिहार स्थानकापासून पूर्वेकडील संपूर्ण रेल्वेविभाग ‘ईशान्स सरहद्द रेल्वे’ या नवीन विभागात समाविष्ट करण्यात आला असून, या विभागाचे पांडू येथे प्रमुख कार्यालय आहे. पांडूचा आसाममधील एक प्रमुख बंदर म्हणून विकास करण्याच्या योजना आहेत. कलकत्त्याकडे जाणाऱ्या मोठ्या बोटींमध्ये मालाची चढउतार करण्यासाठी येथे मोठा मालधक्का आहे.‌

आठल्ये, द. बा.