हेरेदिया, (एरद्या) होसे मारियाद : (२२ नोव्हेंबर १८४२–२ ऑक्टोबर १९०५). फ्रेंच कवी व श्रेष्ठ रचनाकार. त्याचाजन्म हूडानजवळील फूर्शना (क्यूबा) येथे एका सधन स्पॅनिश कॉफीचा शेतकरी व फ्रेंच आई यांच्या पोटी झाला. पॅरिसजवळील सँलिस येथील सेंट व्हिन्सेंट या चर्चमध्ये त्याने सुरुवातीचे पारंपरिक शिक्षण घेतले.नंतर पॅरिसमधील स्कूल ऑफ पॅलिओग्राफी येथून त्याने पुढील शिक्षणघेऊन हवाना विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतले. नंतर पार्नॅसिअननामक साहित्यिकांच्या चमूत तो सहभागी झाला (१८६१). तिथे त्याची मैत्री चालर्समारी-रने लाकॉन्त द लीसली या सुनीत कवीशी जमली आणि तो काव्यरचनेकडे आकृष्ट झाला. त्याने सु. ११८ सुनिते आणि काहीदीर्घ कविता लिहिल्या. त्या ङशी ढीेहिशशी (१८९३) नावाने प्रकाशित झाल्या. या काव्यात त्याने अभिजात वा प्रबोधनकालीन काही क्षण नोंदविले असून काही कलात्मक वस्तूनांही आपल्या कक्षेत आणले आहे. फ्रेंच साहित्यातील सर्वोत्कृष्ट सुनीतांत त्याच्या या काव्याची गणना होते. त्याच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांनी यातील निवडक कवितांचे इंग्रजी भाषांतर द फ्ल्यूट विथ अदर ट्रान्सलेशन्स ॲण्ड पोएम्स (१९७७) या शीर्षकाने प्रसिद्ध झाले. त्याच्या सुनितातील तांत्रिक पूर्णता, संवादी तपशील आणि उच्च श्रवणक्षमता यांमुळे तत्कालीन कवींमध्ये त्याचे नाव झाले. 

 

यामुळेच १८९४ मध्ये फ्रेंच अकादमीवर त्याची निवड झाली. पुढे त्याची Bibliotheque de Arsenalया पॅरिसमधील ख्यातनाम संस्थेत ग्रंथपाल म्हणून नियुक्ती झाली. मृत्यूपूर्वी त्याने आंद्रे द शेन्ये या अठराव्या शतकातील प्रसिद्ध फ्रेंच कवीची Bucoliquesह्या काव्यग्रंथाची आवृत्ती पूर्ण केली. 

 

फ्रान्समधील या हूडानजवळील एका गावात आजाराने त्याचे निधन झाले. 

 गुडेकर, विजया म.