ताती :द. आफ्रिकेतील बोट्स्वाना देशातील प्रमुख नदी. लांबी सु. २७५ किमी. ही दक्षिणवाहिनी आहे. २१° ४५’ द. अक्षवृत्ताजवळ ती पूर्ववाहिनी होऊन शाशी नदीस मिळते. तुशाशी–ताती दुआबात ब्रिटिशांनी एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात बांटू लोकांसाठी खास वसाहती निर्माण केलेल्या होत्या. ताती खोऱ्याच्या विकास योजना बोट्स्वाना सरकारने आखल्या आहेत. त्यामुळे बोट्स्वानासारख्या निमओसाड प्रदेशाला बारमहा वाहणारी ताती नदी वरदान ठरणार आहे.

भागवत, अ. वि.