तमिळ भाषा : लोकसंख्येच्या दृष्टीने तमिळचा क्रमांक द्राविड भाषांत तेलुगूनंतर असला आणि तिचा क्षेत्रविस्तारही त्याच प्रमाणात असला, तरीही ती सर्वांत प्राचीन व समृद्ध द्राविड भाषा आहे. तिचा भाषिक पुरावा (संस्कृत व प्राकृत सोडल्यास) इतर कोणत्याही भारतीय आर्य भाषेपेक्षा जुना आहे. तमिळ भाषेचे ब्राह्मी लिपीतील शिलालेख इ. स. पू. तिसऱ्या शतकापासून आणि तमिळ लिपीतील शिलालेख ख्रिस्तोत्तर सहाव्या शतकापासून उपलब्ध आहेत. तिचे सर्वांत प्राचीन साहित्य ‘संघम्’ या नावाने प्रसिद्ध आहे.

तिच्या भाषिकांची भारतातील एकंदर संख्या १९६१ च्या जनगणनेप्रमाणे ३,०५,६२,७०६ होती. त्यापैकी २,८०,१६,१४७ तमिळनाडू राज्यात होते. उरलेल्यांपैकी कर्नाटकात ८,५९,१७३, केरळात ५,२७,७०८, आंध्रात ५,११,६०४, महाराष्ट्रात १,६७,६९४ व बाकीचे इतर राज्यांत होते. उत्तर श्रीलंकेत ती बहुसंख्य लोकांची मातृभाषा आहे. अनेक तमिळ भाषिक जुन्या काळात मॉरिशस, फिजी बेटे, वेस्ट इंडीज, द. आफ्रिका, मलाया इ. प्रदेशांत मजुरी करण्यासाठी जाऊन स्थायिक झालेले आहेत. या दृष्टीने भारतातील एक आंतरराष्ट्रीय दर्जाची भाषा म्हणून तमिळचा उल्लेख करता येईल.

लेखन व उच्चार : तमिळ भाषेची लिपी ब्राह्मीचे रूपांतर होऊन आलेली आहे. परंतु त्यातील स्वतःच्या भाषिक व्यवहाराला आवश्यक अशी व एवढीच चिन्हे तमिळने स्वीकारली आहेत. तमिळ लिपीवरून किंवा तिच्या रोमनीकृत स्वरूपावरून प्रचलित असलेले गैरसमज भाषाशास्त्रज्ञांच्या परिचयाचे आहेत. म्हणून तिची नीट माहिती असणे फार जरूरीचे आहे.

तमिळ लिपीत बारा स्वर व अठरा व्यंजने आहेत. स्वर अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए (ऱ्हस्व व दीर्घ), ओ (ऱ्हस्व व दीर्घ), ऐ, औ हे असून व्यंजने क, ङ्, च, ञ, ट, ण, त, न, प, म, य, र, ल, व, ड़, ळ, ऴ, न ही आहेत. याचा अर्थ असा नव्हे, की तमिळमध्ये एवढेच उच्चार आहेत. मराठीत ज्याप्रमाणे ‘च’, ‘ज’ इ. अक्षरे प्रत्येकी दोन ध्वनी व्यक्त करतात, त्याचप्रमाणे काही तमिळ अक्षरांचेही आहे. मात्र तमिळमधील अक्षर व उच्चार यांचा संबंध अधिक नियमबद्ध आहे.

तमिळ स्वरांसंबंधी विशेष असे काही सांगण्यासारखे नाही. फक्त ‘ए’ व ‘ओ’ हे स्वर ऱ्हस्व व दीर्घ असतात हे लक्षात ठेवले पाहिजे.

केवळ व्यंजन दाखवायचे झाले, तर व्यंजनाच्या चिन्हावर शिरोबिंदू दिला जातो. म्हणजे जे काम मराठीत व्यंजनाचा पाय मोडून होते ते इथे शिरोबिंदू देऊन होते. व्यंजनसंयोग किंवा संयुक्त व्यंजन दाखवताना अंत्य व्यंजनाशिवाय इतरांवर शिरोबिंदू दिला म्हणजे झाले. उदा., मराठी क्रम = तमिळ कंरम म. पक्का = त. पकंका इत्यादी. या पद्धतीमुळे तमिळचे संयुक्त व्यंजन लिहिणे अतिशय सोपे झाले आहे.

व्यंजनांचा अभ्यास केला तर असे दिसून येईल, की या भाषेत मराठीप्रमाणे , , , , वगैरे महाप्राण अघोष, अल्पप्राण सघोष व महाप्राण सघोष उच्चार दर्शवणारी अक्षरचिन्हे नाहीत. त्याचप्रमाणे हे व्यंजनही नाही. पण तमिळच्या ज्या मूळ ध्वनिपद्धतीसाठी तिची लिपी ठरविण्यात आली तिचे काम या चिन्हांनी भागत होते. मात्र संस्कृतमध्ये नसलेली पण तमिळच्या लेखनाला आवश्यक अशी , , ही नवी चिन्हे तिच्यात आहेत.


आद्य द्राविड भाषेत महाप्राण व्यंजने नाहीत आणि सघोष व्यंजने शब्दारंभी येत नाहीत. तिथे फक्त अघोष व्यंजन येऊ शकतो. म्हणून ‘गार’ व ‘घार’हे शब्द तमिळमध्ये‘कार’असेच लिहिले जातील, तर ‘शिका’ व ‘शिखा’ हे शब्द ‘चिका’असे लिहिले जाऊन त्याचा उच्चार ‘चिगा’,‘शिगा’ किंवा ‘सिगा’ होईल. म्हणजे अघोष व्यंजनाच्या दोन्ही बाजूला स्वर, किंवा आधी त्याच वर्गातील अनुनासिक व्यंजन व नंतर स्वर आला, तर त्याचा सघोष उच्चार होतो. उदा., लेखन ‘अङ्‌क’ –उच्चार ‘अङ्‌ग’, लेखन ‘काक’- उच्चार ‘काग’ इत्यादी. या पद्धतीनुसार ‘गांधी’ हा शब्द लेखनात ‘कान्ती’ आणि उच्चारात ‘कांदी’ असा होईल.

व्यंजनांतील , आणि या चिन्हानी दर्शविलेले ध्वनी मराठीला अपरिचित आहेत. त्यांचे उच्चार पुढीलप्रमाणे : –तालव्य . जिव्हाग्र च्या उच्चारात असते त्यापेक्षा मागे खेचले जाऊन कंप होणारा . जवळजवळ सारखा, पण कंपित. –जिव्हाग्र तालुशिखराच्याही मागे नेऊन उच्चारला जाणारा हा पार्श्विक. आणि यांच्या मध्यावरचा दंतमूलीय .

हा उच्चार मुळ भाषेत नसला, तरी परिवर्तनाच्या ओघात स्वरमध्यस्थ चा झालेला आहे. अनेकवचनाच्या क् या प्रत्ययापूर्वी स्वर आल्यास तो स्वर व मधील यामुळे चा आधी , नंतर घर्षक व शेवटी झालेला आहे.

संधिनियम : बहुतेक संधिनियम उच्चारसुलभतेसाठी आहेत. उदा., स्वरान्त शब्दानंतर स्वरादी शब्द आल्यास मध्ये य् किंवा व् येणे स्वरान्त शब्दानंतर व्यंजनादी शब्द आल्यास त्या व्यंजनाचे द्वित्व होणे इत्यादी.

व्याकरण : नाम : नामांचे दोन मुख्य वर्ग आहेत. एक श्रेष्ठ वर्ग (उयर्/तिणै) व दुसरा कनिष्ठ वर्ग (अल्/तिणै). श्रेष्ठ वर्गात देव, मनुष्य यांचा समावेश होतो. त्यामुळे त्यात पुल्लिंग व स्त्रीलिंग असे भाग आहेत. कनिष्ठ वर्गात निर्जीव पदार्थ, मनुष्येतर प्राणी, झाडे, कल्पना, गुण इत्यादींचा समावेश असून या सर्वांचे एकच असे नपुसकलिंग असते.

वरील आशयगर्भ वर्गीकरणाव्यतिरिक्त काही प्रत्ययांनीही लिंग व्यक्त होते. न्, अन् किंवा आन् हे पुल्लिंगी नामांचे एकवचन दाखवतात ळ्, अळ्, आळ्, किंवा हे स्त्रीलिंगी एकवचन दाखवतात दु किंवा अदु नपुसकलिंग दाखवतात : अवन्, ‘तो’, अवळ् ‘ती’, अदु‘ते’ मगन् ‘मुलगा’, मगळ ‘मुलगी’ इत्यादी. ज्या नामांच्या शेवटी हे प्रत्यय येत नाहीत, त्यांचे लिंग त्याच्या अर्थावरूनच समजून घ्यावे लागते.

श्रेष्ठवर्गीय नामांचे अनेकवचन र्, अर् किंवा कळ् (गळ्, हळ्) हे प्रत्यय लागून होते. न् किंवा ळ् शेवटी असलेल्या नामांना र् किंवा अर् हा प्रत्यय लागतो. इतर नामांना र्, अर् किंवा कळ् हे प्रत्यय लागतात: तेवन्, ‘देव तेवर् देव’ मगन् मुलगामगर् मुलगे. हा प्रत्यय लागण्यापूर्वी अंत्य न् किंवा ळ् चा लोप होतो.

दु शेवटी असलेल्या नपुसकलिंगी नामाचे अनेकवचन हा दु काढून टाकून अथवा त्याऐवजी किंवा वै हा प्रत्यय लावून होते. इतर नपुसकलिंगी नामांना कळ् हा प्रत्यय लागतो चिरियदु ‘थोडे’–चिरिय, चिरियन किंवा चिरियवै पांबु ‘साप’–पांबुगळ् ‘साप’ पसु ‘गाय’–पसुक्कळ् ‘गाई’.


 विभक्ती: विभक्ती आठ आहेत. त्यांचे प्रत्यय असे : प्रथमा–शून्य द्वितीया– तृतीया–आल्, ओदु चतुर्थी–उक्कु, उक्काग पंचमी–इल्, इलिरुंदु, इनिंदु षष्ठी–उडैय, इन्, अदु सप्तमी–इल्, इदत्तिल् संबोधन–.

हे प्रत्यय सर्व नामांना एकवचनात किंवा अनेकवचनात लागतात. सर्व विभक्तिप्रत्यय स्वरादी आहेत. त्यामुळे ते नामांना लावताना विशिष्ट संधिनियम पाळावे लागतात.

सर्वनाम : सर्वनामे पुढीलप्रमाणे :

 

ए. व.

अ. व.  

प्र. पु.  

द्वि. पु.  

तृ. पु.  

नान् ‘मी’ 

नी ‘तू’ 

अवन् ‘तो’  

अवळ् ‘ती’  

अदु ‘ते’ 

नांगळ ‘आम्ही’ नाम् ‘आपण’ 

नींगळ् ‘तुम्ही’ नीर् ‘आपण’

 अवर्, अवर्गळ् ‘ते’ ‘त्या’

अवै, अवैगळ्, अदुगळ् ‘ती’ 

दर्शक सर्वनामविशेषण :

     इवन् ‘हा’, इवळ्ही’, इदुहे

    उवन्तो’, उवळती’, उदुते

 

प्रश्नार्थक सर्वनामविशेषण :

    एवन्~यावन् ‘कोणता’, एवळ्~यावळ् ‘कोणती’, एदु~यादु ‘कोणते’.

विशेषण: विशेषण आहे त्याच रूपात पुढील नामाच्या लिंगवचनाची अपेक्षा न ठेवता वापरले जाते. 

  

संख्यावाचक :पहिले दहा आकडे पुढीलप्रमाणे :

ओन्‍रु ‘एक’  इरंडु ‘दोनमूनरु ‘तीननालु ‘चारअइंदु ‘पाचआरु ‘सहाएडु ‘सातएट्टु ‘आठओनबदु ‘नऊपत्तु ‘दहा’.

संख्यावाचकांना ‘आम्’ किंवा ‘आवदु’ हा प्रत्यय लावून क्रमवाचक विशेषण मिळते. मात्र ओन्‍रु ‘एक’ याचे क्रमवाचक मुदल्, मुदल्आम् किंवा मुदल्आवदु होते. मागे दशकवाचक शब्द आल्यास ते ओराम असे बनते. मुप्पदु ‘तीस’, मुपत्तोराम ‘एकतीस’.


क्रियापद : क्रियापदात वर्तमान, भूत आणि भविष्य हे तीन मुख्य काळ आहेत. धातूला कालवाचक चिन्ह लावून नंतर पुरुष व वचन दर्शक प्रत्यय लावल्याने क्रियापदाचे रूप सिद्ध होते. वर्तमानकाळाचे कालवाचक चिन्ह किर्, भूतकाळाचे त्त् आणि भविष्यकाळाते प्प् हे आहे. या सर्वांचे नकारवाचक रूप एकच होते ते धातूला कोणतेही चिन्ह न लावता एकदम प्रत्यय लावल्याने सिद्ध होते. हे प्रत्यय पुढीलप्रमाणे आहेत :

   

ए. व. 

अ. व. 

प्र. पु. 

 

एन्, अल्, अन् 

ओम, अम्, आम्, एम् 

द्वि. पु.

 

आय्, इ

ईर्, ईर्गळ्

तृ. पु.

पु.

आन्

आर्, आर्गळ्

 

स्त्री.

आळ्

आर्, आर्गळ्

 

न.

आदु

अ, अदुगळ्

   

रु, इत्तु, उम्

उम्

हे प्रत्यय लावून कुळि ‘आंघोळ कर-’ या धातूची रूपे पुढीलप्रमाणे होतात :

 

 

वर्तमानकाळ

 

प्र. पु. 

कुळिक्किरेन् 

कुळिक्किरोम् 

द्वि.पु.

कुळिक्किराय्

कुळिक्कीर, कुळिक्कीर्गळ्

तृ. पु.

कुळिक्किरानू

कुळिक्किरार्, कुळिक्किरार्गळ्

 

कुळिक्किराळ्

 

कुळिक्किरदु, इ.

कुळिक्किंद्रन्, कुळिक्किरदुगळ्

 

 

भूतकाळ 

 

प्र.पु. 

कुळित्तेन् 

कुळित्तोम् 

द्वि. पु.

कुळित्ताय्

कुळित्तीर, कुळित्तीर्गळ्

तृ.पु.

कुळित्तान्

कुळित्तार, कुळित्तार्गळ्

 

कुळित्ताळ्

कुळित्तार, कुळित्तार्गळ्

 

कुळित्तदु

कुळित्तन्

 


     

 

भविष्यकाळ 

 

प्र.पु. 

कुळिप्पेन् 

कुळिप्पोम् 

द्वि. पु.

कुळिप्पाय्

कुळिप्पीर, कुळिप्पीर्गळ्

तृ. पु.

कुळिप्पान्

कुळिप्पार्, कुळिप्पार्गळ्

 

कुळिप्पाळ्

कुळिप्पार्, कुळिप्पार्गळ्

 

कुळिक्कुम्

कुळिक्कुम्

                              तीनही काळांचे नकारवाचक :

प्र. पु.

कुळियेन् 

कुळियोम् 

द्वि.पु. 

कुळियाय् 

कुळियीर्, कुळियार्गळ् 

तृ. पु. 

कुळियान् 

कुळियार्, कुळियार्गळ् 

 

कुळियाळ्

कुळियार्, कुळियार्गळ्

 

कुळियदु

कुळिय

याशिवाय धातूच्या तुबन्त रूपाला इळ्ळै हे नकारवाचक जोडून ते सर्वनामांबरोबर चालवल्याने सर्व काळांचे, सर्व पुरुषांचे, सर्व वचनांचे नकारवाचक होते : नान् कुळिक्कविळ्ळै ‘मी आंघोळ करत नाही, केली नाही, करणार नाहीनीर् कुळिक्कविळ्ळै‘तू आंघोळ करत नाहीस, केली नाहीस, करणार नाहीस’ इत्यादी.


याशिवाय क्रियापदांच्या कालवाचक चिन्हांत थोडा फरक करूनही सौम्य रूपे मिळतात. त्यात क्किर् ऐवजी गिर्, त्त ऐवजी आणि प्प ऐवजी किंवा या चिन्हांचा वापर होतो.

धातूंपासून विशेषणात्मक, नामात्मक, अव्ययात्मक व नकारवाचक धातुसाधिते प्रत्यय लावून मिळतात.

धातूचे रूप जसेच्या तसे वापरल्याने आज्ञार्थाचे एकवचनी रूप मिळते. एकवचनाला उम् किंवा उंगळ् हा प्रत्यय लावून अनेकवचनी रूप तयार होते : नड ‘चाल’.– नडवुम्~नडवुंगळ् ‘चाला’.

नकारवाचक आज्ञार्थ किंवा निषेध धातूला आदे, आदेयुम् किंवा आदेयुंगळ् हे प्रत्यय लावून होतो : पोगादे ‘जाऊ नको’ पोगादेयुम् ‘जाऊ नका’. कधीकधी क्कु हा आधिक्यदर्शक प्रत्यय धातूनंतर येतोनडक्कादे ‘चालू नको’.

शक्यतादर्शक रूपाचा प्रत्यय कूडुम् आहे : नान् कुळिक्कक्कूडुम् ‘मी आंघोळ करू शकतो’.

इच्छादर्शक रूप धातूला हे आश्रित अव्यय लावून होते : पडि ‘शिक–, वाच–’ नान् पडिक्क ‘मला वाचू दे’. हे रूप सर्व लिंगवचनांत सर्व पुरुषांसाठी एकच आहे. तसेच ते भविष्यकाळानंतरआगहा प्रत्यय लावूनही होते:कुळिप्पेनाग ‘माझी आंघोळ करायची इच्छा आहे’. तुबन्त रूपाला कड या क्रियापदाची रूपे लावूनही ते मिळतेनी कुळिक्कक्कडवाय् ‘तुला आंघोळ केली पाहिजे’. इतर काही प्रत्यय लावून हे रूप होते.

भूतकाळाच्या प्रत्ययपूर्व रूपाला आल् हा प्रत्यय लावल्याने संकेतदर्शक रूप मिळते : वोनेन ‘मी गेलो’–पोनाल् ‘जर(मी, तू, इ.) गेलो…….’कुळित्तान्‘ त्याने आंघोळ केली ’–कुळित्ताल्‘ जर(त्याने, मी, तू, इ.) आंघोळ केली…..’.

एकंदर रूपे बनवण्यात मराठीतील रूपप्रक्रियेची आठवण येते. कारण अनेक ठिकाणी या दोन भाषांत तसेच साम्य आहे.

इरु ‘अस–’ या सहायक क्रियापदाच्या रूपांचा इतर क्रियापदांशी संयोग करून संमिश्र काळ मिळतात.

तुबन्त रूपाला पडु ‘सहन कर–’या क्रियापदाची रूपे जोडून कर्मणिप्रयोग सिद्ध होतोअंदुप्पुस्तगम् एन्नाले पडिक्कप्पट्टदु ‘ते पुस्तक मी वाचले’.

धातुला  पि किंवा वि हा प्रत्यय लागून प्रयोजक रूप बनते : कत्किरेन् ‘मी शिकतो’–कत्पिक्किरेन् ‘मी शिकवतो’. प्रयोजक रूप बनवण्याचे आणखीही काही प्रकार आहेत.


अव्यय : क्रियापदाची काही विकारशून्य रूपे अव्यय म्हणून वापरली जातात : पलक्क ‘मोठ्याने’, ‘ओरडून’.

सामान्यपणे नामाला आय किंवा आग हा प्रत्यय लावून अव्यय मिळू शकते : सुगम् ‘आरोग्य’–सुगमाय् ‘उत्तम प्रकारे’.

शब्दयोगी अव्यय: विशिष्ट विभक्तीशी संबंधित अशी विशिष्ट शब्दयोगी अव्यये आहेत : तविर ‘शिवाय’ – एन् मगनैत्तविर मत्त एल्लारुम् वंदार्गळ् ‘माझ्या मुलाशिवाय इतर सर्व आले’.

काही शब्दयोगी अव्यये पुढीलप्रमाणे : उडन् ‘–सह’ आग ‘–लापोरुट्टु,  निमित्तम् ‘–साठीउळ् ‘–तपुडम् ‘–बाहेरमुन् ‘–आधीपिन् ‘–नंतर’ इत्यादी.

उभयान्वयी अव्यय: उम् हे अव्यय दोन अथवा अधिक शब्दांबरोबर आले तर ते ‘आणि’ या अर्थाचे उभयान्वयी अव्यय असते, तर एकाच शब्दानंतर त्याचा अर्थ ‘–सुद्धा’ असा होतो.

प्रश्न ‘हो’ अथवा ‘नाही’ असे उत्तर असणारा प्रश्न सामान्य विधानानंतर हे प्रश्नार्थक ठेवून होतो अवन् तोट्टाक्कारन्(आ): ‘तो माळी(का?). शंका व्यक्त करायची असली, तर ऐवजी येतो.

शब्दाला  किंवा या हे उपसर्ग लावूनही प्रश्नवाचक होते : पडि ‘प्रकार’–एप्पडि ‘कोणत्या प्रकारे, कसं’ पोडुडु ‘काळ, सूर्य’–एप्पोडुडु ‘कोणत्या वेळी, केव्हा’.

वाक्यरचना : वाक्यरचना सामान्यपणे मराठीच्या धर्तीवरच आहे. प्रथम कर्ता व तत्संबंधी शब्द, नंतर कर्म व तत्संबंधी शब्द, नंतर इतर शब्द व शेवटी क्रियापद : ओरु नल्ल मेय्‌प्पन् इंगे वंदान् ‘एक चांगला धनगर इकडे आला’.

कर्ता सर्वनाम असल्यास तो क्रियापदावरून समजण्यासारखा असल्यामुळे व्यक्त केला जात नाही : अदैच्चेयदान् (त्याने) ते केले’.

कर्म श्रेष्ठवर्गीय असल्यास द्वितीयेत असते, नाहीतर प्रथमेचेच रूप वापरण्यात येते.

शब्दसंग्रह : तमिळच्या साहित्यनिर्मितीची सुरुवात ख्रिस्तशकाच्या प्रारंभाइतकी जुनी आहे, तमिळ विद्वानांनी भाषेच्या अभ्यासाकडेही लक्ष पुरवले होते. त्यामुळेच वृत्ताच्या संदर्भात कित्येकदा वापरावे लागणारे कृत्रिम किंवा क्लिष्ट शब्द आणि लोकांच्या तोंडी असणारे नैसर्गिक किंवा परिचित शब्द असे शब्दांचे वर्गीकरण त्यांनी प्राचीन काळीच केले आहे. तोल्काप्पियम् हा व्याकरणग्रंथ ख्रिस्तशकाच्या आरंभाच्या आसपासच्या काळातील असून संस्कृतमधून घेतलेले शब्द तमिळ ध्वनिपद्धतीला अनुसरूनच वापरले जावेत, असे त्यात म्हटलेले आहे. संघम् काळात संस्कृतमधून घेतलेले शब्द फार नव्हते पण शैव, वैष्णव, जैन व बौद्ध धार्मिक प्रचाराच्या काळात हे प्रमाण पुष्कळच वाढले. धार्मिक व तत्त्वज्ञानपर ग्रंथांत हे प्रमाण मोठे असले, तरी साहित्यिक ग्रंथरचनेत ते अतिशय मर्यादित आहे.

संदर्भ: 1. Cohen, Marcel Meillet, Antoine, Les langues du monde, Paris, 1952.

           2. Wickremasinghe, M. deZilva, Tamil Grammar Self-Taught, London, 1906.

कालेलकर, ना. गो.