जंबुद्वीप : पुराणांतरीच्या सप्तद्वीपांपैकी एक. पौराणिक वर्णनाप्रमाणे हे द्वीप पृथ्वीच्या मध्यभागी असून त्याच्या मधोमध मेरू पर्वत आणि सभोवती क्षारसमुद्र आहे. याचे भारतवर्षादी नऊ भाग असून यात नंदनादी चार वने, मानसादी चार सरोवरे होती. जांभूळ वृक्षावरून जंबुद्वीप नाव पडले असावे. काही विद्वानांच्या मते हिमालय,  काराकोरम, कुनलुन, तिएनशान, हिंदुकुश व सुलेमान हे आजचे पर्वत असलेला भाग म्हणजे जंबुद्वीप तर काहींच्या मते आजचे भारत, श्रीलंका, पाकिस्तान, अफगाणिस्तान, पूर्व इराण, आशियातील रशिया, मंगोलियाच्या वाळवंटाखेरीजचा चीन आणि बांगला देश एवढा जंबुद्वीपाचा विस्तार होता. 

कुमठेकर, ज. ब.