चोवीस परगणा पश्चिम बंगाल राज्याचा बंगालच्या उपसागराला लागून असलेला जिल्हा. बंगालच्या उपसागराला गंगा अनेक मुखांनी मिळते,तेथे त्रिभुज प्रदेश निर्माण होऊन अनेक बेटे निर्माण झाली आहेत. तेथे वाढलेल्या झाडींमुळे या भागासच सुंदरबन हेही नाव मिळाले आहे. १७५७ साली बंगालचा नबाब मीर जाफर याने सध्याच्या कलकत्त्याच्या दक्षिणेकडील २४ परगणे ईस्ट इंडिया कंपनीस दिले. त्यावरून या भागास चोवीस परगणा ही संज्ञा मिळाली व आजतागायत ती रूढ आहे [ → पश्चिम बंगाल राज्य ].

शाह, र. रू.