चोला (खिंड) पूर्व हिमालयातील चोला पर्वत श्रेणीमधील एक खिंड. समुद्रसपाटीपासून उंची सु. ४,४१६ मी. २७ २५‘उ. आणि ८८ ४९’पू. सिक्किम ते तिबेटमधील चुंबी खोरे यांदरम्यान ही असून ग्यांगत्से—जलपैगुरी यांना सांधणारा एक मार्ग या खिंडीतून येतो. १९६२ च्या चीन—भारत संघर्षात या खिंडीला बरेच महत्व प्राप्त झाले होते व आजही लष्करी दृष्ट्या एक मोक्याचे ठिकाण म्हणून या खिंडीचे महत्त्व कायमच आहे.

कापडी, सुलभा