तेनाली : आंध्र प्रदेश राज्यातील शेतमालाची एक महत्त्वाची बाजारपेठ. लोकसंख्या १,०२,९४३ (१९७१). हे शहर विजयवाड्याच्या दक्षिणेस सु. ३५ किमी. कृष्णेच्या त्रिभुज प्रदेशातील कालव्यांच्या जाळ्यात, शेतीसंपन्न भागांत वसलेले आहे. दिल्ली–मद्रास लोहमार्गावरील हे एक प्रमुख स्थानक आहे. येथे भात सडण्याच्या, तेलबियांपासून तेल काढण्याच्या, कापूस पिंजण्याच्या गिरण्या असून शेतमालाचे, विशेषतः भात व नारळ यांचे प्रमुख विक्रीकेंद्र आहे.

पंधराव्या–सोळाव्या शतकांतील सुप्रसिद्ध तेलगू कवी व बिरबलासारखा चतुर, हजरजबाबी पंडित तेनाली रामकृष्ण याचे हे जन्मग्राम होय.

फडके, वि. शं.