द्रविड महाकल्प व गण : भारताच्या भूवैज्ञानिक इतिहासाचे टी. एच्. हॉलंड यांनी १९०७ साली जे विभाग केलेले आहेत त्यापैकी पुराण व आर्य या विभागांच्या मधे असलेल्या विभागाचे नाव. कँब्रियनच्या (सु. ६० ते ५४ कोटी वर्षांपूर्वीच्या काळाच्या) प्रारंभापासून तो द्वीपकल्पाच्या व बहिर्द्वीपकल्पाच्या विस्तृत प्रदेशात ठळक दिसून येणारी जी उत्तर कारबॉनिफेरस कालीन (सु. ३५ ते ३१ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) विसंगती आहे. तिच्यापर्यंतच्या भागाचा समावेश द्रविड विभागात होतो व तो यूरोपाच्या प्रमाणभूत अभिलेख मालेतील (खडकांच्या थरांच्या रचनेचा कालानुक्रम दाखविणाऱ्या सारणीतील) पूर्व पुराजीव महाकल्प आणि उत्तर पुराजीव महाकल्पाच्या प्रारंभीचा काही भाग (सु. ६० ते ४० कोटी वर्षांपूर्वीचा काळ) एवढ्याशी तुल्य आहे. द्वीपकल्पात द्रविड महाकल्पाचे खडक आढळलेले नाहीत.

पहा : शैलसमूह, भारतातील.

केळकर, क. वा.