देवरिया : उत्तर प्रदेश राज्यातील याच नावाच्या जिल्ह्याचे व तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ३८,१६१ (१९७१). हे गोरखपूरच्या आग्नेयीस सु. ५० किमी., छोटी गंडक नदीच्या पूरमैदानात वसले आहे. ईशान्य रेल्वेच्या गोरखपूर–छप्रा फाट्यावरील हे स्थानक व जिल्ह्यातील शेतमालाची ही बाजारपेठ असून साखरउद्योग हा येथील मुख्य उद्योग आहे. साखरप्रक्रिया कारखानेही येथे आहेत. याच्या आसमंतात ऊस, मका, तांदूळ, गहू, जव, तेलबिया, कडधान्ये ही मुख्य पिके होतात.

कांबळे, य. रा.