त्रैलोक्यचिंतामणि : सुवर्णघटित योग. घटक : सुवर्णभस्म, रौप्यभस्म, लोहभस्म, प्रवाळ, मोती व पाऱ्‍याचे भस्म ही उक्त प्रमाणात घेऊन कोरफडीच्या रसात एकत्र खलून सावलीत वाळवून ठेवावे. अनुपान : बकरीचे दूध किंवा रोगानुरूप. गुण : क्षय, खोकला, गुल्म, प्रमेह, जीर्णज्वर व उन्मादनाशक. पाण्याने उत्पन्न होणारे दोष नष्ट करतो. सर्वरोगनाशक आहे.

जोशी, वेणीमाधवशास्त्री