कर्णपूरण: (आयुर्वेद). एक उपचार कानात औषधी तेल घालणे. कानाचे विकार, डोक्याच्या हाडांचा भंग यांत कर्णपूरण उपयुक्त. कानात घातल्यावर कानाच्या मुळाशी चोळावे. शंभर अंक मोजेपर्यंत इतका काळ (मात्रा) कानात ते तेल ठेवावे.

जोशी, वेणीमाधवशास्त्री