तुमसर : भंडारा जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या २९,७२१ (१९७१). हे भंडाऱ्याच्या उत्तरेस ४३ किमी. वर आहे. मुंबई–कलकत्ता लोहमार्गावर असल्याने दळणवळण व व्यापाराचे केंद्र आहे. १८६७ पासून येथे नगरपालिका आहे. मध्य प्रदेश राज्याशीही येथून व्यापार चालतो. तांदळासाठी हे विख्यात आहे. पंचे विणण्याचे हे जुने हातमाग केंद्र असून सध्या यंत्रमाग वाढत आहेत. बैलगाड्या बनविण्याचा व्यवसायही येथे मोठ्या प्रमाणावर चालतो.
पाठक, सु. पुं.