तिरुपूर : तमिळनाडू राज्याच्या कोईमतूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर. लोकसंख्या १,१३,३०२ (१९७१). हे मद्रास–कोईमतूर लोहमार्गावर कोईमतूरपासून ४८ किमी. वर आहे. कापसाची ही फार मोठी बाजारपेठ असून येथे सरकी काढणे, गासड्या बांधणे, सूत कातणे, कापड विणणे इ. व्यवसाय चालतात. खादी विणणे व इतर कुटिरोद्योगांचेही हे एक केंद्र आहे. येथील गुरांचा बाजारही मोठा असतो. जवळच कुरूविंदच्या खाणी आहेत. तमिळ भाषेत तिरुपूर म्हणजे पवित्र शहर. येथील शिवमंदिरात वैशाख महिन्यात मोठी रथयात्रा भरते.
फडके, वि. शं.