ताशी चो द्झांग : भूतानमधील एक प्रसिद्ध किल्लेवजा गाव. हे भूतानच्या थिंफू राजधानीजवळच आहे. पश्चिम भूतानमधील रईदाक छुंछू नदीकाठी एका डोंगरावर अत्यंत सुरक्षित ठिकाणी सतराव्या शतकात बांधलेले आहे. येथे ब्रिटिशांच्या राजवटीत उन्हाळ्यात भूतानची राजधानी असे. ताशी चो द्झांग येथे भूतानमधील लामांचा प्रमुख मठ असून येथेच भूतानमधील प्रमुख लामा गुरू राहतात. येथे लाकडावरील कोरीव कामाचे उत्कृष्ट नमूने आहेत. अनेक देशी–परदेशी पर्यटकांचे ताशी चो द्झांग हे एक आकर्षण आहे.

भागवत, अ. वि.