चार्ल्सटन – १ : अमेरिकेच्या पश्चिम व्हर्जिनिया राज्याची राजधानी. लोकसंख्या ७१,५०५ (१९७०). हे कनावा व एल्क नद्यांच्या संगमावर वसलेले असून कोळसा, नैसर्गिक वायू, खनिज तेल, मीठ, कठीण लाकूड इत्यादींचे वितरण केंद्र आहे. रस्ते, लोहमार्ग, जलमार्ग व वायुमार्ग यांच्या सोयी आहेत. येथे मोठमोठे रासायनिक कारखाने असून शुद्ध तेल, दारूगोळा, यंत्रे, रंग, कागद, रबरी व लाकडी वस्तू आणि मुख्यतः काच व काचेच्या बाटल्या यांचे उत्पादन होते. येथे अनेक शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था आहेत.
लिमये, दि. ह.