आहिल्याबाई होळकरांचा रंगमहाल, चांदवड.

चांदवड : चांदोर, नासिक जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण लोकसंख्या ८,७८९ (१९७१). हे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर, अहिल्याबाई होळकरांचा रंगमहाल, चांदवड नासिकच्या ईशान्येस ६४ किमी. व लासलगाव रेल्वे स्थानकाच्या उत्तरेस २२ किमी. आहे. धुळे-नासिक रस्त्यावर असल्यामुळे हे गहू, बाजरी, भुईमूग इ. शेतमालाच्या बाजारपेठेचे केंद्र आहे. येथे रेणुका व कालिका देवींची प्राचीन मंदिरे आहेत. तसेच येथील डोंगरातील जैन लेणी व शिल्पसुंदर कोरीव काम प्रेक्षणीय आहे. येथे मल्हारराव होळकरांची टांकसाळ होती. तसेच अहिल्याबाई होळकरांनी बांधलेला रंगमहाल प्रेक्षणीय आहे. पौष शुद्ध पौर्णिमेस येथे खंडोबाची यात्रा भरते.

कांबळे, य. रा.