चंगजिन : उत्तर कोरियाच्या हामग्याँग प्रांताची राजधानी. लोकसंख्या २,००,००० (१९७०). हे खुले बंदर व्ह्‌लॅडिव्हस्टॉकच्या नैर्ऋत्येस २२५ किमी. आहे. समृद्ध शेतीप्रदेशातील हे शहर जपानी व आता उत्तर कोरियाच्या राजवटीत औद्योगिक केंद्रही बनले आहे. येथे लोखंड व पोलाद, आगपेट्या, सूत व सुती कापड, मासे डबाबंद करणे, रासायनिक पदार्थ इत्यादिकांचे कारखाने असून लोखंड, मासे, कापड, लाकूड यांची येथून निर्यात होते. सैनिक तळ असलेले व फळे आणि मद्य यांच्या उत्पादनाचे १३ किमी.वरील नानाम शहर याचाच भाग बनले आहे.

ओक, द. ह.