झ्दानफ: रशियाचे डोनेट्स्क विभागातील औद्योगिक शहर. लोकवस्ती ४,५१,००० (१९७४ अंदाज). हे महत्त्वाचे बंदर ॲझॉव्ह समुद्र किनाऱ्यावर कालमीऊस व काल्चिक नद्यांच्या खाडीवर असून डोनेट्स कोळसाक्षेत्राशी लोहमार्गाने जोडलेले आहे. येथे लोखंड, पोलाद, कोकसंबंधित रासायनिक पदार्थ, यंत्रे, जहाजदुरुस्ती, मासे पकडणे व डबाबंद करणे, धान्य दळणे इ. कारखाने व व्यवसाय असून लोहधातुक, मँगॅनीज, सिमेंट, खनिज तेल, इमारती लाकूड इत्यादींची आयात व कोळसा, पोलाद, यंत्रे, धान्य इत्यादींची निर्यात होते. येथे एक धातुकर्मशाळाही आहे.

लिमये, दि. ह.