चकोतरा : (इं. ग्रेपफ्रुट लॅ. सिट्रस पॅरॅडिसी कुल-रूटेसी).सु. ६—१४ मी. उंच वाढणारा हा लहान वृक्ष मूळचा वेस्ट इंडीजमधील असून हल्ली अनेक देशांत फळाकरिता त्याची लागवड केली जाते. सिंध, पॅलेस्टाइन व द. आफ्रिका, वेस्ट इंडीज, अमेरिकेची संयुक्त संस्थाने (फ्लॉरिडा, कॅलिफोर्निया व ॲरिझोना) इ. प्रदेशांत व भारतात पंजाब, द. भारत, महाराष्ट्र, गुजरात इ. ठिकाणी लागवडीत आहे.पपनस व मोसंबी यांच्या संकरापासून याची निर्मिती वेस्ट इंडीजमध्ये झाली असावी असे मानतात. पपनस ही स्वतंत्र (सिट्रस डिकुमाना वा सि.ग्रँडिस ) जाती आहे. या दोन्ही सताप कुलातील [→ रूटेसी ] व लिंबू वंशातील [→सिट्रस ] भिन्न जाती आहेत. द्राक्षाच्या घोसाप्रमाणे पण मोठ्या फळांचे घोस या जातीत असल्याने याला ‘ग्रेपफ्रुट’ नाव दिले आहे. पानांना रुंद सपक्ष देठ असून ती पपनसापेक्षा लहान असतात. फुले पांढरी, मोठी, एकेकटी किंवा लहान झुबक्यात व पानांच्या बगलेत असतात. फळ गोलसर किंवा काहीसे लांबट, पपनसापेक्षा लहान(१०—२५ सेंमी. व्यासाचे), मऊ सालीचे, चकाकणारे असून पिकल्यावर पिवळे दिसते. मगज (गर) पांढरा किंवा गुलाबी आणि भरपूर असून तो आंबट कडसर असतो तो लोह, ब आणि क जीवनसत्त्वयुक्त व क्षुधावर्धक असल्याने साखरेबरोबर न्याहारीस खातात. सालीतील पेक्टिनाचा उपयोग जेली बनविण्यास होतो. हिवतापात व पित्तप्रकोपात फळ फार चांगले . त्याच्या रसामध्ये औषधी गुण असून तो नियमितपणे प्याल्यास सर्दीपडसे होत नाही. फळांचा चोथा गुरांना चारतात. विशिष्ट प्रकारच्या मद्यांत फळांचा रस वापरतात.
या खड्ड्यांत जुलै-ऑगस्टमध्ये कलमे लावतात. पहिली तीन वर्षे या बागेमधून भाजीपाल्याची पिके लावतात. त्यांना दिलेल्या खतपाण्याचा आणि मशागतीचा फायदा या फळझाडांना मिळतो. एका हेक्टरमध्ये सु. अडीचशे कलमे लावतात. पहिली तीन वर्षे त्यांची फळे घेत नाहीत. चौथ्या वर्षापासून घेतात. फळांचा हंगाम महाराष्ट्रात सप्टेंबर ते नोव्हेंबर असतो.
दर झाडाला सरासरीने पाचशेपर्यंत फळे लागतात. परंतु काही प्रकारांच्या काळजीपूर्वक जोपासलेल्या एकेका झाडाला वर्षाला पंधराशेपर्यंत फळे लागल्याची नोंद आहे.
“