चंदनबटवा : (सुरका इं. गार्डन ओरॅक, मौंटन स्पिनॅक, सी-पर्स्लेन लॅ. ॲट्रिप्लेक्स हॉर्टेन्सिस कुल-चिनोपोडिएसी). सु. अर्धा मी. उंचीची ही लहान वर्षायू (एक वर्ष जगणारी) ⇨ ओषधी हिरवी पिवळट किंवा लालसर असते या झाडाला कापरासारखा वास येतो खोडावर बारीक खोबणी असतात पाने एकाआड एक व साधी खालची किंचित त्रिकोणी व शेंड्याकडची लांबट खालची बाजू जांभळट पिंगट आणि कडा साधारण दातेरी फुलोरा माठाप्रमाणे कणिशांची परिमंजरी फुले लहान द्विलिंगी व एकलिंगी प्रदलहीन, हिरवट किंवा लालसर असून ऑगस्ट ते ऑक्टोबर मध्ये येतात. काहींत परिदले ३-५ व छदहीन, काहींत फक्त दोनच छदे. केसरदले ३-५ [⟶ फूल] सर्वसाधारण लक्षणे ⇨चिनोपोडिएसी कुलात वर्णिल्याप्रमाणे हिचे मूलस्थान आशिया आहे, पण यापेक्षा अधिक माहिती नाही. बियांतील पूड अ जीवनसत्त्वाभावी देतात. ही वनस्पती पालेभाजीकरिता उपयोगात आहे. संग्रहणी, मूळव्याध या विकारांवर व कृमिनाशक म्हणून उपयुक्त आहे.
पाटील, शा. दा.
पाटील, ह. चिं.