डी – २ : स्कॉटलंडमधील सॅमनसाठी प्रसिद्ध नदी. लांबी १४५ किमी. जलवाहन क्षेत्र १,९८१ चौ. किमी. ॲबर्डीन परगण्यात केर्नगॉर्म पर्वतामध्ये सु. १,२५० मी. उंचीवर उगम पावते व पूर्वेकडे वाहत जाऊन ॲबर्डीन येथे उत्तर समुद्रास मिळते. मुख्य प्रवाह दक्षिणेकडे शीघ्र गतीने डी दरीतून वाहत जाऊन व्हाइट ब्रिज येथे गेल्डीबर्नला मिळतो. नंतर नदी सखल प्रदेशातून वाहत जाते. ॲबर्डीनला या नदीपासून पाणीपुरवठा होतो. नदीमुखावर गोद्या बांधल्या असून सॅमन माशांसाठी ही नदी प्रसिद्ध आहे. डीसाइड भागात मांसासाठी गुरांची पैदास होते.

कांबळे, य. रा.