डिसेंबर : ग्रेगरियन पंचांगातील शेवटचा बारावा महिना. जुन्या रोमन पंचांगात हा दहावा होता व दहा या अर्थाच्या लॅटिन शब्दावरून हे नाव पडले. अँग्लोसॅक्सन लोक याला मिडविंटर किंवा यूल या सणाच्या नावावरून यूल मंथ म्हणत. याच महिन्यात ख्रिश्चनांचा ख्रिसमस म्हणजे नाताळ हा सण असतो. २२ डिसेंबर या दिवशी दक्षिणायन संपते व सूर्य संस्तंभी असतो. पूर्वी याचे २९ दिवस होते, नंतर ३० झाले आणि ऑगस्टचे ३० चे ३१ केले तसेच डिसेंबरचेही ३१ केले. या महिन्यात सूर्य धनू राशीत १५ तारखेला प्रवेश करतो. 

योगी अरविंद घोष यांचा मृत्यू, भारतीय घटनाकार भीमराव आंबेडकर यांचा मृत्यू, सरदार पटेल यांचा मृत्यू या घटना या महिन्यात घडल्या.

 ठाकूर, अ. ना.